"तो मुलाच्या बर्थडे पार्टीचा प्लॅन करत होता, आता आम्ही त्याच्या अंत्यसंस्काराची योजना आखतोय": पूंछ हल्ल्यातील शहीद जवानाचे नातलग

ज्या घरात मुलाचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू होती, त्याच घरात आता त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे....
शहीद विक्की पहाडे त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत
शहीद विक्की पहाडे त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत @arungudda

IAF Soldier Vikky Pahade: शनिवारी दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या (IAF) ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात शहीद झालेले जवान विकी पहाडे (वय-३३) यांच्या एकुलत्या एका मुलाचा पुढील महिन्यात ७ जून रोजी वाढदिवस होता. त्यामुळे विकी आपल्या पाच वर्षांच्या मुलाच्या बर्थडे पार्टीचा सरप्राईज प्लॅन आखत होते. यानिमित्त विकी घरी येणार होते. सरप्राईज देण्यासाठी ते छिंदवाडा जिल्ह्यातील एका चुलत भावाच्याही संपर्कात होते. मात्र, मुलाच्या वाढदिवसापूर्वीच दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले. ज्या घरात मुलाचा वाढदिवस साजरा करण्याची तयारी सुरू होती, त्याच घरात आता त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे.

पहाडे यांचे चुलत भाऊ राजकुमार गोणेकर यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की,“संपूर्ण कुटुंब त्याच्या परतीची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्या मुलाचा वाढदिवस ७ जून रोजी आहे. पण आता आम्ही त्याच्या अंत्यसंस्काराची तयारी करत आहोत.” पहाडे यांचे पार्थिव सोमवारी घरी पोहोचण्याची शक्यता आहे. नियोजनाबद्दल बोलताना गोणेकर सांगतात की, “दोन अधिकारी इथे पाठवले आहेत आणि अंत्यसंस्काराच्या मार्गाचे नियोजन करत आहेत.”

पहाडे यांचे चुलत भाऊ गोणेकर सरकारला विनंती करत म्हणाले की,. “या काळात सरकारने आम्हाला पाठिंबा द्यावा अशी आमची इच्छा आहे. देशासाठी लढताना शहीद झालेल्या आमच्या भावाचा आम्हाला अभिमान आहे. यापुढेही प्रशासन आणि राजकारण्यांकडून कुटुंबाला असाच पाठिंबा मिळेल अशी मला आशा आहे.”

दोन आठवड्यांपूर्वी आहे होते घरी

जवान पहाडे हे नुकतेच दोन आठवड्यांपूर्वी बहिणीच्या लग्नासाठी घरी आले होते. त्याच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, पहाडे २०११ मध्ये भारतीय हवाई दलात दाखल झाले. कारण त्यांचे दिवंगत वडील दीम पहाडे यांचे ते स्वप्न होते. गोणेकर सांगतात की, त्याचे वडील लहान असतानाच वारले. त्यामुळे माझ्या भावाने वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी खूप कष्ट केले, खूप अभ्यास केला. एवढंच नाही तर गेल्या काही वर्षांत त्यांनी तिन्ही बहिणींची लग्नं लावून दिली. खूप संघर्षानंतर सर्व कुटुंबीय आता शांत जीवन जगत होते. आता प्रत्येक व्यक्ती दुःखात आहे, त्यांच्या आईला धक्का बसला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार पोलीस अधीक्षक मनीष खत्री यांनी सांगितले की, पहाडे यांचे पार्थिव आयएएफच्या विशेष विमानाने महाराष्ट्रातील नागपुरात आणले जाईल. त्यानंतर रस्त्याने मृतदेह छिंदवाडा येथे आणण्यात येईल. गार्ड ऑफ ऑनर देऊन त्यांचे अंत्यसंस्कार केले जातील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in