आयएएस-आयपीएसची पदे रिक्त;केंद्रीय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती

२०२२ पर्यंत आयएएसची १४७२ तर आयपीएसची ८६४ पदे रिक्त आहेत. २०१२ नंतर केंद्र सरकारने वार्षिक भरती १८० ने वाढवली आहे.
आयएएस-आयपीएसची पदे रिक्त;केंद्रीय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती
Published on

सरकारी नोकरीचे आकर्षण वाढत चालले आहे. विशेष करून कोरोना काळानंतर नागरी सेवा परीक्षा देण्याकडे तरुणांचा कल वाढू लागला आहे. तरीही आयएएस-आयपीएसची २३०० पदे रिक्त आहेत, अशी माहिती केंद्रीय कार्मिक मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली. ते म्हणाले की, २०२२ पर्यंत आयएएसची १४७२ तर आयपीएसची ८६४ पदे रिक्त आहेत. २०१२ नंतर केंद्र सरकारने वार्षिक भरती १८० ने वाढवली आहे.

मसुरीतील लालबहाद्दूर शास्त्री प्रशासनीक अकादमी ही नोकरशहा घडवणारी प्रशिक्षण संस्था आहे. आयएएससाठी १८० पेक्षा जास्त सं‌ख्या झाल्यास प्रशिक्षणाच्या गुणवत्तेबाबत तडजोड होईल. रिक्त पदे भरणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. सर्व रिक्त पदे भरली जावीत, असा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in