कोणाचा राजीनामा माझ्याकडे आला तर मी त्याला राजीनामा देऊ नका असे सांगू का? - भगतसिंग कोश्यारी

कायद्याची जाण असलेलेच या निकालावर भाष्य करतील. मी कायद्याचा विद्यार्थी नाही. मला संसदीय कामकाजाची माहिती आहे.
कोणाचा राजीनामा माझ्याकडे आला तर मी त्याला राजीनामा देऊ नका असे सांगू का? - भगतसिंग कोश्यारी
Published on

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने राज्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर न्यायालयाने मोठा निकाल दिला असून राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांवर तोंडसुख घेतले. राज्यपालांनी घेतलेले निर्णय कायद्यानुसार नव्हते, असे स्पष्ट मत न्यायालयाने आपल्या निकालात नोंदवले आहे. विरोधी पक्षांनी यावर टीका सुरू केली असताना खुद्द भगतसिंग कोश्यारी यांनी मीडियाशी बोलताना सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. तेव्हा बहुमत चाचणीचा निर्णय चुकीचा होता. आता त्याचे काय करायचे? न्यायालयाने यासंदर्भात सर्व काही सांगितले आहे. 

भगतसिंह कोश्यारी यांनी असेही नमूद केले की, “न्यायालयाच्या निकालाबद्दल मला काहीही बोलायचे नाही”. तीन महिन्यांपूर्वी राज्यपालपदावरून बाजूला झालो. मी स्वत:ला राजकीय विषयांपासून दूर ठेवले आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात होते. त्यावर न्यायालयाने निकाल दिला आहे. कायद्याची जाण असलेलेच या निकालावर भाष्य करतील. मी कायद्याचा विद्यार्थी नाही. मला संसदीय कामकाजाची माहिती आहे. त्यावेळी मी जे पाऊल उचलले ते विचारपूर्वक उचलले. कोणाचा राजीनामा माझ्याकडे आला तर मी त्याला राजीनामा देऊ नका असे सांगू का? सर्वोच्च न्यायालयाने काही सांगितले असेल तर त्याचे विश्लेषण करणे हे विश्लेषकाचे काम आहे, माझे नाही,” कोश्यारी म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in