The Kashmir Files : ज्युरीने 'दि काश्मीर फाईल्स'ला म्हटले अश्लील प्रोपगेंडा; अनुपम खेर यांनी केला पलटवार

विवेक अग्निहोत्रीचा 'दि काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा देशासह जगभर गाजला. मात्र, अद्यापही मागील वाद काही कमी होताना दिसत नाहीत.
The Kashmir Files : ज्युरीने 'दि काश्मीर फाईल्स'ला म्हटले अश्लील प्रोपगेंडा; अनुपम खेर यांनी केला पलटवार

भारतासह जगभरात विवेके अग्निहोत्रीचा 'दि काश्मीर फाईल्स' (The Kashmir Files) हा चांगलाच गाजला. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येवर हा चित्रपट आधारित होता. गेल्या वर्षभरात या कमी बजेट असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई तर केलीच, शिवाय जगभरातील संमिक्षकांचीदेखील मने जिंकली. मात्र

हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचे (IFFI) ज्युरी प्रमुख नदव लॅपिड (Nadav Lapid) यांनी या चित्रपटाचे वर्णन 'अश्लील प्रोपेगेंडा' असे केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा वादाला सुरुवात झाली आहे.

इस्रायली चित्रपट निर्माते नदव लॅपिड यांनी हे वक्तव्य केल्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. "खोट्याची उंची कितीही मोठी असली, तरी सत्याच्या तुलनेत ती नेहमीच लहान असते." असं म्हणत त्यांनी नदव लॅपिड यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

याशिवाय अभिनेता दर्शन कुमारनेदेखील यावर नाराजी व्यक्त करताना म्हंटले की, "प्रत्येक जण जे पाहतो आणि ऐकतो, त्यावर त्यांचे स्व:ताचे एक मत असते. पण, द काश्मीर फाइल्स हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या समुदायावर आधारित आहे. हे सत्य नाकारता येणार नाही."

नेमकं काय म्हणाले ज्युरी?

गोव्यातील पणजीमध्ये सुरु असलेल्या इफ्फीमध्ये नदव लॅपिड यांनी म्हंटले की, "आम्ही सर्व नाराज आहोत. हा चित्रपट आम्हाला प्रोपगंडा आणि वलगर वाटला. एवढ्या मोठ्या प्रतिष्ठित महोत्सवासाठी काश्मीर फाइल्स योग्य नाही. मी व्यासपीठावर माझ्या भावना मोकळेपणाने सांगू शकतो. ही एक महत्त्वाची चर्चा आहे, जी न डगमगता व्हायला हवी. कला आणि जीवनासाठी ते आवश्यक आहे."

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in