आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

कुटुंबीयांसमोर लॉक उघडण्यात आले
आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

नवी दिल्ली : आयआयटी, दिल्लीच्या विद्यार्थ्याने आपल्या हॉस्टेल रूममध्ये आत्महत्या केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आयुष आशना असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. नुकतीच त्याने अंतिम वर्षाची परीक्षा दिली होती. दुर्घटनास्थळी कोणतीही आत्महत्यापूर्व चिठ्ठी सापडलेली नाही.
किशनगड पोलीस स्टेशनवर फोन आल्यानंतर पोलिसांनी हॉस्टेलमध्ये धाव घेतली. त्याच्या रूमला आतून लॉक केले होते. त्याच्या कुटुंबीयांसमोर लॉक उघडण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in