पहिले वेअरेबल पेमेंट्स इकोसिस्टम लाँच; आयआयटी मद्रास-एनपीसीआयसोबत भागीदारी

आता वापरकर्ते आपल्या "रिंग वन" या स्मार्ट वेअरेबल अंगठीला कोणत्याही एनएफसी सक्षम पेमेंट डिव्हाइसवर टॅप करून तत्काळ आणि सुरक्षित व्यवहार करू शकतात. त्यासाठी मोबाईल फोन, कार्ड किंवा वॉलेटची गरज भासत नाही.
पहिले वेअरेबल पेमेंट्स इकोसिस्टम लाँच; आयआयटी मद्रास-एनपीसीआयसोबत भागीदारी
Photo : X (@IndianInfoGuid)
Published on

नवी दिल्ली: आयआयटी-मद्रासद्वारे प्रवर्तित 'म्यूस वेअरेबल्स' या स्टार्टअपने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) सोबत भागीदारी करून भारतातील पहिले वेअरेबल पेमेंट्स इकोसिस्टम सुरू केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी सोमवारी दिली.

या नव्या इकोसिस्टमद्वारे वापरकर्ते आपल्या "रिंग वन" या स्मार्ट वेअरेबल अंगठीला कोणत्याही एनएफसी सक्षम पेमेंट डिव्हाइसवर टॅप करून तत्काळ आणि सुरक्षित व्यवहार करू शकतात. त्यासाठी मोबाईल फोन, कार्ड किंवा वॉलेटची गरज भासत नाही.

बेंगळुरूमध्ये मुख्यालय असलेले 'म्यूस वेअरेबल्स' हे २०० सदस्यांचे डीप-टेक टीम असून अमेरिका, युरोप आणि इतर देशांमध्ये त्यांचे ऑपरेशन्स आहेत. कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने तयार करते.

'डिजिटल वॉलेट इकोसिस्टममध्ये परदेशी तंत्रज्ञान कंपन्यांना टक्कर देत आम्ही भारतासाठी एक खऱ्या अर्थाने सार्वभौम पर्याय निर्माण करत आहोत. हे सिद्ध करते की जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान भारतातही विकसित केले जाऊ शकते.

'म्यूस वॉलेट' द्वारे आम्ही कॅशलेस पेमेंट्स अधिक सोपे करत आहोत. पुढील दोन वर्षांत आम्ही लाखो रुपे कार्डधारकांना वेअरेबल पेमेंट्सचा अनुभव देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे," असे म्यूस मुख्य कार्यकारी अधिकारी के.एल.एन. साई प्रशांथ यांनी सांगितले. वेअरेबल्सचे सह-संस्थापक व म्यूस वॉलेट कोणतेही रुपे क्रेडिट किंवा डेबिट कार्ड सुरक्षित डिजिटल टोकनमध्ये रूपांतरित करते आणि ते थेट छेडछाड-प्रतिरोधक चिपमध्ये साठवते. हीच सुरक्षा पातळी बँक कार्डे आणि पासपोर्टमध्ये वापरली जाते. त्यामुळे संवेदनशील माहिती मोबाईलच्या ओएस किंवा ॲप्लिकेशन्सपासून पूर्णपणे वेगळी राहते.

या तंत्रज्ञानाविषयी अधिक माहिती देताना कंपनीचे सह-संस्थापक व मुख्य परिचालन अधिकारी प्रत्युषा कमराजुगड्डा म्हणाले, 'आम्ही भारतातील पहिली सुरक्षित टोकनायझेशन प्लॅटफॉर्म तयार केला. ज्याद्वारे वापरकर्ते कोणतेही रुपे कार्ड जोडून फोन किंवा वॉलेटशिवाय फक्त रिंग टॅप करून पेमेंट करू शकतील. भारतात जन्मलेल्या कल्पनेने जागतिक स्तरावर वैयक्तिक तंत्रज्ञानासाठी नवा मापदंड निर्माण केल्याचा आम्हाला अभिमान आहे.

नवे तंत्रज्ञान

भारताची यूपीए यंत्रणा ही जगात लोकप्रिय होत आहे. विशेष करून भारतात मोठ्या प्रमाणावर तिची मागणी वाढत आहे. दररोज कोट्यवधी भारतीय त्याचा वापर करतात. त्यातून हजारो अब्ज रुपयांचे व्यवहार होतात. सध्या हे व्यवहार करताना मोबाईलची गरज पडते. आता नवीन वेअरेबल पेमेंट सिस्टीममुळे संपूर्ण जगच बदलून जाणार आहे. त्यामुळे मोबाईलचीही गरज लागणार नाही. ग्रामीण भागातील माणसेही सहजपणे पेमेंटस्चे व्यवहार सहजपणे करू शकतील. त्याचा फायदा सर्वांनाच होणार आहे. बोटात मावणाऱ्या रिंगने सर्व व्यवहार होणार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in