आयआयटी-मंडी घडवणार 'ड्रोन दीदी'... हिमाचल प्रदेशातील महिला शेतकऱ्यांना मिळणार प्रशिक्षण

हिमाचल प्रदेशातील महिलांना शेतीच्या कामासाठी ‘ड्रोन’ वापरण्याचे प्रशिक्षण आयआयटी, मंडी देणार आहे. ‘ड्रोन दीदी’ या उपक्रमांतर्गत हे प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य विकसित केले जाईल.
आयआयटी-मंडी घडवणार 'ड्रोन दीदी'... हिमाचल प्रदेशातील महिला शेतकऱ्यांना मिळणार प्रशिक्षण

नवी दिल्ली : हिमाचल प्रदेशातील महिलांना शेतीच्या कामासाठी ‘ड्रोन’ वापरण्याचे प्रशिक्षण आयआयटी, मंडी देणार आहे. ‘ड्रोन दीदी’ या उपक्रमांतर्गत हे प्रशिक्षण देऊन त्यांचे कौशल्य विकसित केले जाईल.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, कृषी ड्रोनमुळे कीटकनाशके मारण्यासाठी अत्यंत कमी वेळ लागतो. तसेच या कीटकनाशकांचा शरीरावर कमी परिणाम होतो. या महिलांना ड्रोन तंत्रज्ञान शिकवले जात आहे.

शेतीकामासाठी महिलांचे सबलीकरण करण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे. आम्हाला महिलांना केवळ ‘किसान ड्रोन ऑपरेटर’ बनवायचे नाही, तर त्यांना नेते व उद्योजक बनवायचे आहे, असे आयआयटी मंडीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोमजीत अमृत यांनी सांगितले.

हा कार्यक्रम तीन महिन्यांचा आहे. हिमाचल प्रदेश हा फलोत्पादनासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे किसान ड्रोनची मागणी वाढत आहे. त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच उद्योजकही तयार होतील. हा प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर नेण्याचीही आयआयटी मंडीची योजना आहे, असे त्यांनी सांगितले.

या प्रकल्पाचा लाभ झालेल्या शशी बाला म्हणाल्या की, मी बीएसस्सी कृषी क्षेत्राची पदवी घेतली आहे. ‘ड्रोन’चा शेती क्षेत्रात वापर हा करिअरचा नवीन मार्ग आहे. या प्रशिक्षण शिबिरातून मी काही कौशल्य शिकवले. त्यात ड्रोन ॲॅप्लिकेशन, देखभाल, उद्योगाची कौशल्ये, अन्य कौशल्ये आदी बाबी शिकलो. तसेच कोमल ठाकूर या आणखी एक लाभार्थी म्हणाल्या की, मी शेतकरी कुटुंबातील असून माझे शिक्षण इलेक्ट्रिकल इंजिनिअरपर्यंत झाले. टोमॅटो व सफरचंदावर कीटकनाशक कसे फवारायचे हे मला शिकायचे होते. ‘ड्रोन दीदी’ प्रकल्पामुळे मला मोठी मदत झाली. विशेष म्हणजे, हे काम शिकायला कोणताही आर्थिक भार सोसावा लागला नाही. ड्रोनचे नियम, ॲॅप, व्यवसायाचे धडे आदी बाबी मला शिकायला मिळाल्या, असे त्या म्हणाल्या.

आयआयटीच्या टीमने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही या उपक्रमाचे सादरीकरण केले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in