
मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२२मध्ये आयकर रिटर्नच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात आयकर परताव्यांची संख्या ७.१४ कोटी होती, जी त्याआधीच्या आर्थिक वर्षात ६.९ कोटी होती, अशी माहिती सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (सीबीडीटीच्या अध्यक्षा संगीता सिंग यांनी दिली.
संगीता सिंह म्हणाल्या की, आधार आणि सुधारित रिटर्न भरणाऱ्या करदात्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. बोर्ड कर संकलनात वाढ पाहत आहे, जे सामान्यतः जेव्हा देशाच्या आर्थिक वाढीमध्ये वरचा कल दाखवत असतो तेव्हा होते. सीबीडीटी चेअरमन म्हणाल्या की, जर आर्थिक घडामोडी वाढत असतील तर खरेदी-विक्रीत वाढ होईल. जोपर्यंत अर्थव्यवस्था वरच्या दिशेने जात नाही, तोपर्यंत करांमध्ये वाढ होऊ शकत नाही. सीबीडीटी अध्यक्षांनी शनिवारी सांगितले की, प्राप्तिकर रिटर्नच्या संख्येत झालेली वाढ हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराचा आणि डिजिटल इंडियाच्या आवाहनाचा परिणाम आहे. कोविड-१९ काळात लोकांनी डिजिटल पद्धतीने अधिक पैसे भरण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे कदाचित लोकांचे मत बदलत आहे. त्या म्हणाल्या की, आर्थिक वर्ष २०२२ साठी कर संकलन १४ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे, जे आर्थिक वर्ष २०२० च्या संकलनाच्या तुलनेत खूपच चांगले आहे. कर भरण्याबाबत लोकांना जागरूक करण्यासाठी सीबीडीटीद्वारे प्रधान मुख्य आयुक्तांमार्फत आउटरीच कार्यक्रम आयोजित केले जातात. याच क्रमाने अपडेटेड रिटर्न्स सारख्या उपक्रमांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.