बिहारमध्ये धार्मिक मिरवणुकीत दगडफेक

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांचा आरोप
बिहारमध्ये धार्मिक मिरवणुकीत दगडफेक

नवी दिल्ली : हरियाणातील नूह येथे धार्मिक मिरवणुकीत झालेल्या दगडफेकीसारखाच प्रकार बिहारच्या मोतिहारी येथे घडला आहे, असा आरोप केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केला.

मोतीहारी येथे नागपंचमीला धार्मिक मिरवणुकीवर दगडफेक झाली. मोदीजी हे भांडण लावत असल्याचा आरोप ‘इंडिया’ आघाडी करत आहे. मात्र, जातीपातीचे राजकारण काँग्रेसने कायम केल्याचा आरोप त्यांनी केला. ‘टुकडे टुकडे गँग’ ही गंगा जमुनी तेहजीब’ची भाषा करते. गंगा व यमुना या आमच्या आई आहेत, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत आहेत. बिहारचा ताबा ‘इसिस’ने घेतल्याची चिंता त्यांना नाही.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in