छत्तीसगडमध्ये नक्षलवद्यांचा मतदान केंद्रावर ताबा? पोलीस आणि नक्षवाद्यांमध्ये चकमक सुरु

छत्तीसगडमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २२.१८% मतदान झालं आहे.
छत्तीसगडमध्ये नक्षलवद्यांचा मतदान केंद्रावर ताबा? पोलीस आणि नक्षवाद्यांमध्ये चकमक सुरु

छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. परंतु हा भाग नक्षलग्रस्त असल्याने सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंतच मतदान घेतलं जाणार आहे. २० पैकी १० मतदार संघात ही वेळ आहे. असं असताना मतदारांना नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांच्या छायेत मतदानाला यावं लागणार आहे.

आज दुपारपर्यंत तीन ठिकाणी नक्षलवाद्यांचे हल्ले केले आहेत. एका ठिकाणी आयईडी बॉम्बस्फोट करण्यात आला असून यात एक सीआरपीएफ जवान जखमी झाला आहे. तर दोन ठिकाणी मतदान केंद्रावर गोळीबार करत केंद्र ताब्यात घेण्यात आलं आहे. नारायणपूरमध्ये नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक सुरु आहे. दोन्ही बाजूने गोळीबार केला जात आहे. या ठिकाणी लक्षलवाद्यांनी मतदान केंद्रावर ताबा मिळवला आहे. या ठिकाणी पोलिसांच्या मदतीने हेलिकॉप्टरने सुरक्षा दलाची तुकडी रवाना करण्यात आली आहे.

सुकमामध्ये नक्षलवाद्यांना मतदानासाठी जात असलेल्या मतदारांवर गोळीबार करुन मतदान केंद्रावर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. कोंटा पोलीस ठाणे क्षेत्रातील बंडामध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये फायरिंग झाली. तसंच दुरमा आणि सिंगारामच्या जंगलातून नक्षल्यांनी मोर्टार डागलं होतं. दरम्यान, छत्तीसगडमध्ये सकाळी ११ वाजेपर्यंत २२.१८% मतदान झालं आहे.

logo
marathi.freepressjournal.in