गुजरातमध्ये मुलगी झाली म्हणून आई-वडिलांनी नवजात मुलीला जिवंत गाडले

गुजरातमधील गंभोई गावात ही घटना घडली असून, पोटात साडेसात महिन्यांचे असतानाच बाळाने वेळेआधीच जन्म घेतला
गुजरातमध्ये मुलगी झाली म्हणून आई-वडिलांनी नवजात मुलीला जिवंत गाडले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ असा नारा दिला असतानाच, त्यांच्या गुजरातमध्येच नवजात मुलीला जिवंत गाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी झाली म्हणून आई-वडिलांनीच नवजात मुलीला अक्षरश: जिवंत गाडले.

गुजरातमधील गंभोई गावात ही घटना घडली असून, पोटात साडेसात महिन्यांचे असतानाच बाळाने वेळेआधीच जन्म घेतला. वडील शैलेश बेरोजगार आणि गर्भवती पत्नीसह सासरी मुक्काम त्यातच मुलीची प्रकृती नाजूक असल्या हॉस्पिटलचा खर्च करण्याची ऐपत नसल्याने हे पाऊल उचलल्याचे नवजात बाळाच्या आरोपी आई-वडिलांनी सांगितले.

आई मंजुळाने गुरुवार, ४ ऑगस्ट रोजी मुलीला जन्म दिला. वेळेआधीच जन्म झाल्याने नवजात बाळाची प्रकृती नाजूक होती. त्यातच मुलगी जन्माला आल्याने तिला आई-वडिलांनी जिवंतपणेच एका शेतात गाडले. जितेंद्रसिंह धाबी या शेतकऱ्याला हे बाळ जिवंत असल्याचे आढळून आले. त्यांनी मेहसाना जिल्हा पोलिसांकडे याबाबतची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी बाळाच्या पालकांना शोधून काढण्यासाठी जंगजंग पछाडले. बाळाचे आई-वडील मात्र मेहसाना जिल्ह्यातील कडी गावात लपून बसले होते.

एक गर्भवती बाई आणि तिचा पती गुरुवार सकाळपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षकाला मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेसह विशेष पथकाने या प्रकरणात नवजात बालकाच्या पालकांचा शोध घेतला. या आरोपी आई-वडिलांविरोधात भारतीय दंड संहिता विधान कलम ३०७, ३१७ आणि ४४७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in