गुरुग्रामच्या मतदारांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांचे वर्चस्व; ८० पुढील मतदारांची संख्या ६७ हजारांवर

गुरुग्रामच्या मतदारांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांचे वर्चस्व; ८० पुढील मतदारांची संख्या ६७ हजारांवर

गुरुग्राम : हरयाणातील गुरुग्राम या लोकसभा मतदारसंघात ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांचे मतदारांमध्ये अधिक वर्चस्व असून त्यांची संख्या या मतदारसंघात अधिक आहे. या मतदारसंघात वयाची ८० वर्षे ओलांडलेल्या मतदारांची संध्या ६७००० पेक्षा अधिक आहे. या मतदारसंघात एकूण मतदारांची संख्या २५ लाख २१ हजार ३३२ इतकी आहे.

एकूण मतांपैकी मध्यम वयोगटातील मतदारांमध्ये ३६ हजार ३३४ महिला ( ५४ टक्के), ३० हजार ७०० पुरुष (४६ टक्के) आहेत तर ९० ते ८९ या वयोगटातील मतदारांमध्ये ५२ टक्के महिला आणि ४८ टक्के पुरुष आहेत. ९० ते ९९ वयोगटात ६० टक्के महिला व ४० टक्के पुरुष मतदार आहेत.

तसेच १०० ते १०९ वयोगटात ६० टक्के महिला आणि ४० टक्के पुरुष मतदार आहेत. ११० ते ११९ वयोगटातील मतदारांमध्ये ८२ टक्के महिला आणि १८ टक्के पुरुष आहेत. लोकसभा मतदारसंघात १२० वर्षांवरील मतदारांमध्ये तीन पुरुष व चार महिला मतदार आहेत.

या मतदारसंघात वयोवृद्ध महिलांना मतदानाबाबत जागरुक कसे करायचे हे निवडणूक आयोगासमोर मोठे आव्हान असेल. त्यांना घराबाहेर पडावे व मतदान करावे. ही स्थिती म्हणजे आव्हानात्मक असू शकेल.

जिल्हा निवडणूक अधिकारी निशांत कुमार यादव यांनी सांगितले आहे की, लोकसभा निवडणूक २०२४ दरम्यान दिव्यांग आणि ८५ वर्षांवरील मतदारांसाठी मतदान केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अपंग आणि वृद्ध मतदारांना सहज प्रवेश मिळावा यासाठी, रॅम्प, व्हीलचेअर, वाहतूक व्यवस्था, वैद्यकीय किट इत्यादी सुविधांव्यतिरिक्त, एनसीसी आणि एनएसएस या संस्थांचे स्वयंसेवक मतदान केंद्रांवर त्यांच्यासोबत तैनात केले जातील. आयोगाने सक्षम ॲपदेखील तयार केले आहे. अपंग मतदारांच्या निवडणुकीशी संबंधित माहिती त्याद्वारे मिळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in