भारतात ९७ कोटी मतदार, २ कोटी तरुणांचे नाव मतदार यादीत

२०२४ च्या निवडणुकीत ९७ कोटी मतदार पात्र ठरले असून १८ ते २९ वयोगटातील दोन कोटी मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले
भारतात ९७ कोटी मतदार, २ कोटी तरुणांचे नाव मतदार यादीत

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. २०२४ च्या निवडणुकीत ९७ कोटी मतदार पात्र ठरले असून १८ ते २९ वयोगटातील दोन कोटी मतदारांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले आहे, अशी माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली.

२०१९ पेक्षा नोंदणीकृत मतदारांच्या संख्येत ६ टक्क्याने वाढ झाली आहे. पुण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, महिला मतदारांची संख्या वाढली आहे. घराघरात तपासणी करून १ कोटी ६५ लाख, ७६ हजार ६५४ मतदारांची नावे मतदार यादीतून काढली आहेत. यात ६७ लाख ८२ हजार ६४२ मतदार मृत झाले आहेत, ७५ लाख ११ हजार १२८ मतदार अनुपस्थित, तर २२,५६८५ मतदारांची नावे दोन वेळा यादीत आली आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in