भारतात जुलैच्या पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झाली घट

पेट्रोलच्या विक्रीतही जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात ७.८ टक्के घट होऊन १.३८ दशलक्ष टन वापर झाला.
भारतात जुलैच्या पंधरवड्यात पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झाली घट

भारतात जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मागील महिन्याच्या वरील कालावधीच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत घट झाली आहे. मान्सूनला जोरदार सुरुवात झाल्याने काही क्षेत्रांकडून मागणीत घट झाल्याचे पेट्रोलियम उद्योगातील आकडेवारीवरुन रविवारी दिसून आले.

देशात डिझेलचा वापर सर्वाधिक होत असताना १ ते १५ जुलै दरम्यान त्याच्या वापरात १३.७ टक्के घट होऊन ३.१६ दशलक्ष टन वापर झाला. मागील महिन्यात वरील कालावधीत ३.६७ दशलक्ष टन डिझेलचा वापर झाला होता. पेट्रोलच्या विक्रीतही जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात ७.८ टक्के घट होऊन १.३८ दशलक्ष टन वापर झाला. तथापि, जुलै २०२१ च्या तुलनेत पेट्रोलचा वापर २३.३ टक्के जास्त आणि जुलै २०२० मधील वरील कालावधीच्या तुलनेत ४६ टक्के जास्त आहे. तसेच जुलै २०१९ मधील कोविडपूर्व पातळीपेक्षा २७.९ टक्के अधिक आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in