जम्मू-काश्मिरात दगडफेकीचे प्रकार ९१ टक्के घटले

३७० कलम हटवल्यानंतरचा परिणाम
जम्मू-काश्मिरात दगडफेकीचे प्रकार ९१ टक्के घटले

श्रीनगर : जम्मू-काश्मिरात कलम ३७० हटवल्यानंतर दगडफेकीच्या घटना ९१ टक्के कमी झाल्या आहेत. २०१५ ते २०१९ दरम्यान ५०६३ दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या, तर २०१९ ते २०२३ दरम्यान ४३४ घटना घडल्या.

दहशतवादी व त्यांच्या साथीदारांना होणाऱ्या अटकेचे परिणाम ५ पट वाढले आहेत. २०१५ ते २०१९ दरम्यान ४२७ दहशतवाद्यांना अटक झाली होती, तर

२०१९ ते २०२३ दरम्यान २३२७ दहशतवाद्यांना पकडले. जम्मू-काश्मीर पोलिसांनी कलम ३७० हटवण्यापूर्वी व नंतरच्या ४ वर्षांतील गुन्हेगारी घटनांची माहिती जारी केली. २०१५ ते २०१९ दरम्यान ३२९ सुरक्षा दलांच्या जवानांचा मृत्यू झाला. २०१९ ते २०२३ दरम्यान १४६ सुरक्षा दलांच्या जवानांचा मृत्यू झाला.

logo
marathi.freepressjournal.in