कर्नाटकात काँग्रेसकडून विधासभा परिसराचे गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण, व्हिडिओ व्हायरल

या व्हिडिओत काँग्रेस समर्थक एका पुजाऱ्याला सोबत घेवून विधानसभेच्या परिसरात गोमुत्र आणि डेटॉल शिंपडताना दिसून येत आहे.
कर्नाटकात काँग्रेसकडून विधासभा परिसराचे गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण, व्हिडिओ व्हायरल

कर्नाटकता भाजपला पराभवाची धुळ चारत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली. यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यासह मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा देखील अगदी उत्साहात पार पडला. सत्ता स्थापन केल्यानंतर कर्नटकच्या विधानसभेत काँग्रेसच्या आमदारांनी पहिल्यांदा पाऊल ठेवले. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विधानसभा परिसराची गोमुत्र शिंपडून तसेच पुजा करुन शुद्धता करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काँग्रेस समर्थक एका पुजाऱ्याला सोबत घेवून विधानसभेच्या परिसरात गोमुत्र आणि डेटॉल शिंपडताना दिसून येत आहे. तसेच बाजूला पुजा देखील मांडण्यात आल्याचे दिसत आहे.

कर्नाटकात काँग्रेसने सत्ता स्थापन केल्यानंतर तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यावेळी परंपरेनुसार अधिवेशन भरण्यापुर्वी परिसर गोमुत्राने शुद्ध केला असल्याचे सांगितले जात आहे. एएनआय या वृत्त संस्थेने याबाबतचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक काँग्रेस समर्थक हातात गोमुत्राची बादली घेवून पुजा करतात त्या काठीने सर्वत्र गोमुत्र शिंपडताना दिसून येत आहे. विधानसभेचा चारही बाजूने गोमुत्र शिंपडण्यात आल्याची माहिती आहे.

काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांनी भाजपने भ्रष्टाचार करून विधानसभा परिसर प्रदुषित केल्याचे म्हटले होते. तसेच काँग्रेस सत्तेत आल्यास विधानसभेचा परिसर गोमुत्र शिंपडून शुद्ध केला जाईल, असे देखील ते म्हणाले होते. मात्र, या गोमुत्र शिंपडत असल्याच्या व्हिडिओत काँग्रेसचा एकही मंत्री तसेच आमदार दिसून येत नाही. केवळ काँग्रेसच्या कार्यकर्यांनी हा कार्यक्रम पार पाडल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, भाजपने भ्रष्ट कारभार करुन परिसर प्रदुषित केल्याने तेथील वातावरण शुद्ध करण्याचा हा प्रयत्न असल्याचे काँग्रेसच्या एका समर्थकाने म्हटले आहे. तर भाजपने या कार्यक्रमाला तुच्छ प्रकार असल्याचे सांगितले. यावेळी भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात चौकशीचे आदेश देण्याचे आवाहन एका भाजप समर्थकाने केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in