मार्चमध्ये जीएसटी संकलन १.७८ लाख कोटींवर; जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च संकलन

एप्रिल २०२३ मध्ये आतापर्यंतचे सर्वोच्च जीएसटी संकलन १.८७ लाख कोटी रुपये इतके नोंदवले गेले होते. मार्च २०२४ साठी जीएसटी महसूल परताव्यासह १.६५ लाख कोटी रुपये झाले, जे एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत १८.४ टक्क्यांनी जास्त आहे.
मार्चमध्ये जीएसटी संकलन १.७८ लाख कोटींवर; जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचे दुसरे सर्वोच्च संकलन

नवी दिल्ली : मार्चमध्ये जीएसटी संकलन ११.५ टक्क्यांनी वाढून १.७८ लाख कोटी रुपये झाले असून आतापर्यंतचे ते दुसरे सर्वोच्च संकलन ठरले आहे. देशांतर्गत खरेदीत मोठी वाढ झाल्याचे दिसून येते, असे अर्थ मंत्रालयाने सोमवारी सांगितले.

गेल्या आर्थिक वर्षात (एप्रिल २०२३-मार्च २०२४) एकूण जीएसटी संकलन २०.१८ लाख कोटी रुपये असून आधीच्या आर्थिक वर्षातील संकलनापेक्षा ते ११.७ टक्के जास्त आहे. आर्थिक वर्ष २४ साठी सरासरी मासिक सकल संकलन रु. १.६८ लाख कोटी झाले होते, जे आधीच्या आर्थिक वर्षात रु. १.५ लाख कोटींपेक्षा जास्त होते.

मार्च २०२४ साठी सकल वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) महसुलात वार्षिक ११.५ टक्के वाढीसह रु. १.७८ लाख कोटी इतके झाल्याने ते दुसरे सर्वोच्च संकलन ठरले आहे. ही वाढ देशांतर्गत जीएसटी संकलनात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते, कारण १७.६ टक्के व्यवहार जास्त झाले, असे अर्थ मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

एप्रिल २०२३ मध्ये आतापर्यंतचे सर्वोच्च जीएसटी संकलन १.८७ लाख कोटी रुपये इतके नोंदवले गेले होते. मार्च २०२४ साठी जीएसटी महसूल परताव्यासह १.६५ लाख कोटी रुपये झाले, जे एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत १८.४ टक्क्यांनी जास्त आहे.

logo
marathi.freepressjournal.in