सिक्कीममध्ये तमांग यांनी घेतली सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

सिक्कीममध्ये प्रेमसिंग तमांग यांनी सोमवारी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गंगटोकच्या पालजोर स्टेडियममध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांच्यासह ८ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.
सिक्कीममध्ये तमांग यांनी घेतली सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

गंगटोक : सिक्कीममध्ये प्रेमसिंग तमांग यांनी सोमवारी सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गंगटोकच्या पालजोर स्टेडियममध्ये झालेल्या शपथविधी सोहळ्यात त्यांच्यासह ८ आमदारांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली.

सिक्कीममध्ये विधानसभेच्या ३२ जागा असून, तमांग यांच्या सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाने (एसकेएम) ३१ जागा जिंकून निर्विवाद बहुमत मिळविले. सिक्कीममध्ये सत्ताधारी ‘एसकेएम’ने सिक्कीम डेमोक्रॅटिक फ्रंटचा (एसडीएफ) सुपडा साफ केला. सिक्कीममध्ये २५ वर्षे सत्ता उपभोगलेल्या ‘एसडीएफ’ला यावेळी फक्त एक जागा मिळाली. एसडीएफचे नेते व माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांनी दोन जागांवरून निवडणूक लढवली होती, मात्र दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला, तर काँग्रेस-भाजपला एकही जागा मिळाली नाही.

logo
marathi.freepressjournal.in