आर्थिक स्थितीत महाराष्ट्रच अव्वल गुजरात सातव्या क्रमांकावर; डॉएच्च बँकेचा अहवाल

मुख्य अर्थतज्ज्ञ कौशिक दास यांनी देशातील १७ राज्यांच्या आर्थिक आरोग्यावर एक अहवाल तयार केला
आर्थिक स्थितीत महाराष्ट्रच अव्वल गुजरात सातव्या क्रमांकावर; डॉएच्च बँकेचा अहवाल

नवी दिल्ली : राज्यातून गेल्या काही महिन्यांत मोठे औद्योगीक प्रकल्प बाहेर गेले असतानाही देशातील मजबूत आर्थिक स्थिती असलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे. तर गरीब राज्य समजले जाणारे छत्तीसगड दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राशी कायम स्पर्धा करणारे गुजरात राज्य आर्थिक स्थितीबाबत सातव्या क्रमांकावर फेकले गेले आहे. डॉएच्च बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ कौशिक दास यांनी देशातील १७ राज्यांच्या आर्थिक आरोग्यावर एक अहवाल तयार केला.

२०२३-२४ च्या अर्थसंकल्पातील अंदाजानुसार, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, छत्तीसगड दुसऱ्या क्रमांकावर तर तेलंगणा या अहवालात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

तर आर्थिक स्थिती कमजोर असलेल्या खालून तीन क्रमांकावर प. बंगाल, पंजाब व केरळ यांचा समावेश आहे.

२०२२-२३ च्या अर्थसंकल्पाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र हा सर्वोच्च स्थानावर आहे.

आंध्र प्रदेशचे रँकिंग २०२१-२२ मध्ये आठव्या क्रमांकावर होते. ते २०२२-२३ मध्ये ११ व्या स्थानकापर्यंत घसरले.

गुजरात पाचव्या क्रमांकावरून सातव्या स्थानावर घसरला.

१७ राज्याच्या आर्थिक स्थितीत वित्तीय तूट, राज्यांचे स्वत:चा कर महसूल, राज्यावरील कर्ज व महसूलाच्या तुलनेत व्याजाची रक्कम भरणे आदींचा अभ्यास केला.

logo
marathi.freepressjournal.in