देशभरात ९६ मतदारसंघात मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरात ९६ जागांसाठी सोमवारी मतदान होणार आहे.
देशभरात ९६ मतदारसंघात मतदान

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरात ९६ जागांसाठी सोमवारी मतदान होणार आहे. या टप्प्यात सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, महुआ मोईत्रा, असदुद्दीन ओवैसी, रावसाहेब दानवे, नित्यानंद रॉय, अधीररंजन चौधरी, युसूफ पठाण, वाय. एस. शर्मिला आदी दिग्गजांचे भवितव्य पणाला लागणार आहे. आंध्र प्रदेश विधानसभेसाठीही सोमवारी मतदान होणार आहे. चौथ्या टप्प्यात देशभरात १७१७ उमेदवार रिंगणात असून १७.७० कोटी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकीसाठी १.९२ लाख मतदान केंद्रे उभारली आहेत. आतापर्यंत मतदानाच्या तीन टप्प्यात लोकसभेच्या ५४३ पैकी २८३ जागांचे मतदान पार पडले आहे.

सोमवारी तेलंगणातील १७, आंध्रातील २५, उत्तर प्रदेशातील १३, बिहारमध्ये ५, झारखंडमध्ये ४, मध्य प्रदेशातील आठ, महाराष्ट्रातील ११, ओदिशातील ४, प. बंगालमधील ८ व जम्मू-काश्मीरमध्ये एका जागेवर मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरात ३७० कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणुका होत आहेत. प्रतिष्ठेच्या श्रीनगर लोकसभा मतदारसंघात १७.४८ लाख मतदार आहेत.

logo
marathi.freepressjournal.in