९५ सेलिब्रिटींच्या नावे महाठगाचा बँकांना गंडा ; क्रेडिट कार्ड बनवून घोटाळा

दिल्ली पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश करून ५ जणांना अटक केली आहे. या आरोपींनी अनेक बॉलिवूड अभिनेते व क्रिकेटर्सच्या जीएसटी क्रमांक शोधून काढले
९५ सेलिब्रिटींच्या नावे महाठगाचा बँकांना गंडा ;  क्रेडिट कार्ड बनवून घोटाळा

सायबर गुन्हेगार रोज नवनवीन प्रकारे नागरिकांना गंडवत असल्याचे उघड झाले आहे. या सायबर गुन्हेगारांची फसवणुकीची नवीन पद्धत पाहून आपले कोणतेही डिटेल्स सुरक्षित आहेत का, असा प्रश्न पडत आहे. या गुन्हेगारांच्या टोळीने सचिन तेंडुलकर, धोनी, शिल्पा शेट्टी, आलिया भट्ट यांच्यासह ९५ सेलिब्रिटींची खासगी माहिती चोरून क्रेडिट कार्ड बनवून बँकांची ५० लाखांची फसवणूक केली आहे.

दिल्ली पोलिसांनी एका टोळीचा पर्दाफाश करून ५ जणांना अटक केली आहे. या आरोपींनी अनेक बॉलिवूड अभिनेते व क्रिकेटर्सच्या जीएसटी क्रमांक शोधून काढले. त्यानंतर त्यांचे पॅनकार्ड डिटेल्स शोधले. पुण्यातील फिनटेक स्टार्टअप ‘वन कार्ड’वरून त्यांच्या नावाचे क्रेडिट कार्ड बनवली. ‘वन कार्ड’ कंपनीला या घोटाळ्याची माहिती मिळाली. परंतु या चोरांनी कार्डचा वापर करून २१.३२ लाख रुपयांच्या वस्तूंची खरेदी केली होती. त्यानंतर कंपनीने तात्काळ दिल्ली पोलिसांना याची सूचना दिली. पोलिसांनी कारवाई करून पाच जणांना अटक केली.

दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, पुनीत, मोहम्मद असिफ, सुनील कुमार, पंकज मिश्रा व विश्व भास्कर शर्मा अशी घोटाळेबाजांची नावे आहेत. अटकेनंतर या आरोपींची चौकशी केली. त्यावेळी आरोपींनी आपण कसा गंडा घालत होतो, याची माहिती दिली. आरोपींनी गुगलवरील नामवंत व्यक्तींच्या जीएसटीची माहितीचा वापर करत होते. जीएसटीआयएनमध्ये पहिले दोन क्रमांक हे राज्याचा कोड व नंतर १० आकडे हे त्यांचा पॅन क्रमांक असतो. तसेच या नामवंतांची जन्मतारीख गुगलवर होती. पॅन क्रमांक व जन्मतारीख मिळाल्यानंतर ‘पॅन’संबंधी महत्त्वाची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी पॅनकार्ड पुन्हा बनवले व त्यावर स्वत:चा फोटो चिकटवला. व्हिडीओ फेरतपासणी त्यांचा चेहरा पॅन व आधार कार्डच्या छायाचित्राशी मिळताजुळता राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in