रशियाच्या अध्यक्षपदी पुतिन यांची फेरनिवड

रशियात नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत पुतिन यांनी विरोधकांना डावलून ८८ टक्के मते मिळवली आहेत. देशाच्या सर्वोच्च पदी पुतिन यांची यंदा सलग पाचव्या वेळी निवड झाली आहे.
रशियाच्या अध्यक्षपदी पुतिन यांची फेरनिवड

मॉस्को : रशियाच्या अध्यक्षपदी व्लादिमीर पुतिन यांची फेरनिवड झाली आहे. त्यामुळे पुढील सहा वर्षांसाठी रशियावर पुन्हा पुतिन यांचेच नियंत्रण राहणार आहे. सन २००० पासून पुतिन या पदावर आहेत. रशियात नुकत्याच पार पडलेल्या अध्यक्षीय निवडणुकीत पुतिन यांनी विरोधकांना डावलून ८८ टक्के मते मिळवली आहेत. देशाच्या सर्वोच्च पदी पुतिन यांची यंदा सलग पाचव्या वेळी निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यानिमित्त पुतिन यांचे अभिनंदन केले असून भारत-रशिया पूर्वापार असलेले संबंध अधिक दृढ करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनीही पुतिन यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रशिया-युक्रेन युद्धामुळे पाश्चिमात्य जगताबरोबर बिघडलेले संबंध, पूर्वीचे सहकारी आणि वाग्नर ग्रुपचे नेते येवगेनी प्रिगोझीन यांचे बंड आणि नंतर विमान अपघातात झालेला मृत्यू, विरोधक अलेक्सी नवाल्नी यांचा तुरुंगात संशयास्पद रीतीने झालेला मृत्यू अशा अनेक कारणांनी पुतिन यांच्याविरुद्ध वातावरण तयार झाले होते. पण त्या सगळ्यावर मात करत पुतिन हे आपली सत्ता राखण्यात यशस्वी ठरले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in