नवी दिल्ली : दिल्ली-गाजियाबाद-मेरठ दरम्यान १७ किमीच्या आरआरटीएस कॉरिडॉरवर धावणाऱ्या ट्रेनचे नामकरण ‘नमो भारत’ ट्रेन केले आहे. या ट्रेनचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. १७ किमी लांबीच्या या मार्गावर पाच स्टेशन आहेत. या ट्रेन ताशी १८० किमी वेगाने धावणार आहेत. दर १५ मिनिटाला ही ट्रेन धावेल, तर गरज पडल्याची या ट्रेनची वारंवारता ५ मिनिटांवर आणली जाईल. या ट्रेनमुळे दिल्ली ते मेरठ हे अंतर एका तासात कापले जाईल.