नवी मुंबई मेट्रोचे ३० ऑक्टोबरला ;पंतप्रधानांच्या हस्ते उद‌्घाटन

नवी मुंबईत पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्याची तयारी करण्यात गुंतले आहेत.
नवी मुंबई मेट्रोचे ३० ऑक्टोबरला ;पंतप्रधानांच्या हस्ते उद‌्घाटन

नवी मुंबई : नवी मुंबई मेट्रोचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानुसार, राज्य सरकारसह नवी मुंबईत पंतप्रधानांच्या संभाव्य दौऱ्याची तयारी करण्यात गुंतले आहेत.

नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनासह त्याच दिवशी राज्य शासनाद्वारे ‘नमो महिला सशक्तीकरण अभियाना’चा शुभारंभ नवी मुंबईतून केला जाणार आहे. या महिला मेळाव्यास राज्यातून विविध महिला बचत गटातील १ लाखाहून अधिक महिला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

या नमो महिला सशक्तीकरण अभियानाच्या शुभारंभाची व नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाची तयारी करण्यासाठी शनिवारी खारघर येथील गोल्फ कोर्सवर सर्व शासकीय अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. नवी मुंबई मेट्रोच्या उद्घाटनाची तयारी करण्याची जबाबदारी सिडको व्यवस्थापनावर असेल, तर रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नमो महिला सशक्तीकरण अभियानाच्या शुभारंभाची तयारी ही महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोत्ती अभियान (एमएसआरएलएम-उमेद) आदी शासकीय प्राधिकरणे करणार आहेत.

गेल्या एप्रिलमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन खारघरला केले होते. या सोहळ्याला लाखोंच्या संख्येने श्री सदस्य उपस्थित होते. त्यावेळी उष्माघातामुळे १४ हून अधिक श्री सदस्यांचा नाहक बळी गेला. सध्या ऑक्टोबर हिटचा उकाडा नागरिकांना असह्य होत आहे. तरीही एक लाखांहून अधिक महिलांना एकत्र आणणे कितपत सयुक्तिक ठरेल, याची चर्चा सर्वत्र सु‌रू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in