
नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने २०२४-२५ या आर्थिक वर्षाचे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची तारीख ३१ जुलै २०२५ वाढवून १५ सप्टेंबर २०२५ केली आहे. यामुळे करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्राप्तिकर विवरणपत्र फार्मची अधिसूचना जारी करण्यास विलंब लागल्याने हा निर्णय घेण्यात आला. प्राप्तिकर खात्याने ‘एक्स’वर हा निर्णय जाहीर केला.
आयटीआर फॉर्म, सिस्टीमचा विकास, टीडीएस क्रेडिट आदींच्या सुधारणांमुळे अधिक कालावधी प्राप्तिकर विवरण खातेदारांना दिला आहे,
प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची तारीख वाढल्याने करदात्यांना दिलासा मिळणार आहे. ही प्रक्रिया अधिक पारदर्शी व सोपी असेल. त्यामुळे करदात्यांच्या चुका कमी होतील व योग्य पद्धतीने विवरणपत्र दाखल करण्यास मदत मिळेल.
२०२५-२६ मध्ये कर विवरणपत्र भरण्याची पद्धत बदलली आहे. आयटीआर एक ते सात पर्यंत सर्व फॉर्म अर्थसंकल्पानुसार बदलले आहेत. प्राप्तिकर विभागातर्फे ‘आयटीआर’ ई-फायलिंग युटिलिटी जाहीर करण्यास विलंब झाल्याने विवरणपत्र भरण्यास सुरुवात झालेली नाही.