आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्याने सरकारी तेल कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम; फिच रेटिंग्जचा अहवाल

गेल्या चार महिन्यांपासून सरकारी तीन तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर वाढल्याने  सरकारी तेल कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम; फिच रेटिंग्जचा अहवाल

पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीच्या किंमती गेल्या काही महिन्यांपासून स्थिर असल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दरात वाढ झाल्याने सरकारी तेल कंपन्यांच्या नफ्यावर परिणाम झाला आहे. चालू आर्थिक वर्षात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि.चा नफा कमी होणार आहे, असे फिच रेटिंग्जने बुधवारी म्हटले आहे.

गेल्या चार महिन्यांपासून सरकारी तीन तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. मोठ्या प्रमाणावर महागाई वाढल्याने दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारला मदत व्हावी म्हणून तेल कंपन्यांनी पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी दरात वाढ केलेली नाही, असेही फिचने म्हटले आहे.

चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या तिमाहीत भारतात इंधनाची विक्री कोविड-१९ पूर्व पातळीवर गेली आहे. सरकारी तेल कंपन्यांचा तोटा वाढता वाढत असून पहिल्या तिमाहीत तो १८,४८० कोटी रुपये झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढले असतानही गेल्या चार महिन्यांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली असतानाही किंमत वाढवली जात नसल्याने हा तोटा वाढत असल्याची माहिती इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि., हिंदुस्तान पेट्रोलिमय कॉर्पोरेशन लि.ने शेअर बाजाराला दिली आहे.

तीन सरकारी तेल कंपन्यांनी ज्या इंधनाची किरकोळ विक्री करताना त्यांनी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून दर स्थिर ठेवल्याने पेट्रोल, डिझेल आणि देशांतर्गत एलपीजीमधील नफ्यात घट झाल्याने तोटा वाढत आहे. स्वयंपाकाचा एलपीजी गॅसच्या दरातही वाढ झालेली नाही.

एचपीसीएलचे १०,१९७

कोटींचे नुकसान

त्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढू शकतात. कारण, देशातील सरकारी तेल कंपन्यांचे नुकसान होत आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (एचपीसीएल) ला आर्थिक वर्ष २०२२-२३च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) १०,१९६.९४ कोटींचा तोटा झाला आहे. कोणत्याही तिमाहीत कंपनीला झालेला हा सर्वाधिक तोटा आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला १,७९५ कोटी रुपयांचा नफा झाला होता. जानेवारी-मार्च तिमाहीत हा आकडा १,९००.८० कोटी रुपये होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in