काँग्रेसमधून राजीनामा देण्याच्या प्रमाणात वाढ; बंगाल, आसाममधील काँग्रेस नेत्यांची सोडचिठ्ठी; आंध्रच्या YSRCP खासदाराचाही राजीनामा

देशातील विविध राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता विविध राजकीय पक्षांमधून राजीनामा देत भाजपमध्ये येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.
काँग्रेसमधून राजीनामा देण्याच्या प्रमाणात वाढ; बंगाल, आसाममधील काँग्रेस नेत्यांची सोडचिठ्ठी; आंध्रच्या YSRCP खासदाराचाही राजीनामा

नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता विविध राजकीय पक्षांमधून राजीनामा देत भाजपमध्ये येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस नेते कौस्तुव बागची यांनी, आंध्र प्रदेशात वायएसआरसीपीचे लोकसभा सदस्य मागुंता श्रीनिवासुलू रेड्डी यांनी तर आसाममध्ये काँग्रेस नेते राणा गोस्वामी यांनी राजीनामा दिला आहे. स्वाभिमान हा मुद्दा, योग्य मान पक्षात दिला जात नसल्याचा मुद्दा यावरून हे राजीनामे दिले जात असल्याचे दिसून येत आहे.

पश्चिम बंगालचे काँग्रेस नेते कौस्तुव बागची यांनी बुधवारी राजीनामा दिला, आपल्याला संघटनेत आदराचा अभाव असल्याचा दावा करीत त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे राजीनामापत्र पाठवले आहे. तसेच त्याच्या प्रती त्यांनी प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी आणि सरचिटणीस राज्य प्रभारी गुलाम अहमद मीर यांना पाठवल्या आहेत.

गेल्या वर्षी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यावरून अटकेनंतर जामिनावर सुटल्यानंतर ते अस्वस्थ होते. ते म्हणाले की, मला लोक पक्षविरोधीही म्हणतील, मात्र भ्रष्टाचारी तृणणूल काँग्रेसशी हातमिळवणी करण्याच्या आपण विरोधात आहोत. काँग्रेस नेतृत्वाने प. बंगालला महत्त्वच दिलेले नाही त्यामुळे मला माझ्या स्वाभिमानाशी तडजोड करायची नाही आणि तसे राहावयाचेही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर त्यांना भवितव्याबद्दल विचारले असता त्यांनी भाजपमध्ये जाण्याचे संकेत दिले.

logo
marathi.freepressjournal.in