IND vs AUS, ODI World Cup: विश्वचषकासाठी अहमदाबादला आज विशेष रेल्वे गाडी

ही गाडी सीएसएमटी, दादर, ठाणे, वसई रोड, सुरत, वडोदरा, अहमदाबाद येथे थांबेल.
IND vs AUS, ODI World Cup: विश्वचषकासाठी अहमदाबादला आज विशेष रेल्वे गाडी

मुंबई : क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा सामना पाहायला अहमदाबादला जाणाऱ्यांसाठी मध्य रेल्वेने मुंबईतून विशेष रेल्वे गाडीची सोय केली आहे. ०११५३ ही विशेष गाडी १८ नोव्हेंबरला रात्री १०.३० वाजता सीएसएमटीवरून सुटणार आहे. ही गाडी सकाळी ६.४० वाजता अहमदाबादला पोहोचेल. तर ०११५४ अहमदाबाद-सीएसएमटी ही विशेष गाडी अहमदाबादवरून शनिवारी रात्री ०१.४५ वाजता सुटून सकाळी १०.३५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

ही गाडी सीएसएमटी, दादर, ठाणे, वसई रोड, सुरत, वडोदरा, अहमदाबाद येथे थांबेल. या गाडीला एक फर्स्ट एसी, तीन सेकंड एसी, ११ थर्ड एसी असे डबे आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in