देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

पांरपरिक पोषाखात नटलेले स्त्री-पुरुष सर्व कार्यक्रमांत उत्साहाने भाग घेत होते
देशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

नवी दिल्ली : भारताचा ७७ वा स्वातंत्र्य दिन मंगळवारी देशभरात उत्साहात साजरा झाला. राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर झालेल्या शानदार समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्वजारोहण करत देशवासीयांना संबोधित केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून शुभसंदेश प्रसारित केला होता. विविध राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये, सरकारी आस्थापनांत, तसेच ग्रामीण भागातही मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्थानिक अधिकारी आणि नागरिकांनी ध्वजारोहण करत आनंद साजरा केला. अनेक देशांच्या राजधानीतील भारतीय वकिलातींमध्येही तिरंगा फडकावण्यात आला.

देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह सोमवारपासूनच जाणवत होता. अनेक शहरांतील मुख्य आणि प्रसिद्ध इमारतींवर तिरंग्याच्या रंगांमध्ये विद्युत रोषणाई करण्यात आली होती. पंतप्रधानांच्या हर घर तिरंगा आवाहनाला साद देत अनेक नागरिकांनीही घरावर तिरंगा फडकावण्याची तयारी केली होती. शहरांत चौकाचौकांत तिरंग्याची विक्री होत होती. फुलांच्या माळा आणि मिठाईची दुकाने सजली होती. शाळकरी मुलांचा आनंद तर ओसंडून वाहत होता. विविध ठिकाणच्या वसाहतींत रहिवाशांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम, तसेच खेळ आणि स्पर्धा आयोजित केल्या होत्या. पांरपरिक पोषाखात नटलेले स्त्री-पुरुष सर्व कार्यक्रमांत उत्साहाने भाग घेत होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in