महाराष्ट्र, झारखंडमध्ये इंडिया आघाडी एकत्र लढणार; जयराम रमेश यांनी केले स्पष्ट

हरयाणा आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि ‘आप’ची आघाडी होण्यास फारसा वाव नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.
महाराष्ट्र, झारखंडमध्ये इंडिया आघाडी एकत्र लढणार; जयराम रमेश यांनी केले स्पष्ट
(संग्रहित छायाचित्र)

नवी दिल्ली : हरयाणा आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि ‘आप’ची आघाडी होण्यास फारसा वाव नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी गुरुवारी येथे स्पष्ट केले.

महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये इंडिया आघाडी विधानसभा निवडणूक एकत्रित लढणार आहे, असेही रमेश यांनी म्हटले आहे.

राज्यातील निवडणुकांसाठी इंडिया आघाडीत केवळ एकच सूत्र नाही, राज्यांमध्ये काँग्रेसचे नेते आणि आघाडीतील भागीदार यांच्यात सहमती झाल्यास आघाडी एकत्र लढेल, असेही रमेश यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

पंजाबमध्ये इंडिया गठबंधन नाही, हरयाणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही एक जागा आपला दिली, मात्र विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया गठबंधन असेल असे आपल्याला वाटत नाही. दिल्लीत ‘आप’नेच विधानसभा निवडणुकीत आघाडी नसल्याचे स्पष्ट केले आहे, असेही ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in