कृत्रिम बुद्धिमत्ता सज्जतेमध्ये भारत अव्वल १० उद्योगांमध्ये; देशाची खासगी AI गुंतवणूक तिपटीने वाढल्याचा जागतिक बँकेचा दावा

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सज्जतेच्या बाबतीत भारत जगातील आघाडीच्या १० उद्योगांमध्ये समाविष्ट आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता सज्जतेमध्ये भारत अव्वल १० उद्योगांमध्ये; देशाची खासगी AI गुंतवणूक तिपटीने वाढल्याचा जागतिक बँकेचा दावा
कृत्रिम बुद्धिमत्ता सज्जतेमध्ये भारत अव्वल १० उद्योगांमध्ये; देशाची खासगी AI गुंतवणूक तिपटीने वाढल्याचा जागतिक बँकेचा दावा'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on: 

नवी दिल्ली : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) सज्जतेच्या बाबतीत भारत जगातील आघाडीच्या १० उद्योगांमध्ये समाविष्ट आहे. देशातील मोठा तांत्रिक कार्यवर्ग, जागतिक स्तरावर जोडलेले एआय क्षेत्र आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा यांच्या सहाय्याने भारत या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यासाठी उत्तम स्थितीत आहे, असे जागतिक बँकेने मंगळवारी एका अहवालाद्वारे जाहीर केले.

जागतिक बँकेने 'इंडिया अँड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स: सीझिंग द डेव्हलपमेंट अपॉर्च्युनिटी' अहवालात म्हटले आहे की, भारतातील खासगी एआय गुंतवणूक २०२४ मधील १.२ अब्ज डॉलरवरून तिप्पट होऊन २०२५ मध्ये ४.१ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे.

ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सद्वारे नियुक्त केलेल्या व्यावसायिकांची संख्या २०२५ मध्ये वाढून २३.६ लाख (२.३६ दशलक्ष) झाली. ती मागील वर्षी १९ लाख (१.९ दशलक्ष) होती, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

अहवालात नमूद करण्यात आले आहे की, एआयचा दीर्घकालीन आर्थिक आणि श्रम बाजारावरील प्रभाव अद्याप अनिश्चित आहे.

तंत्रज्ञानाचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एआय सक्षम पायाभूत सुविधा अधिक बळकट करणे, व्यावसायिक वातावरण सुधारणे, एआयचा प्रवेश सुलभ करणे आणि कामगारांची क्षमता वाढवणे यासाठी सर्वसमावेशक धोरणात्मक उपायांची गरज असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

'इंडिया डेव्हलपमेंट अपडेट' हा अहवाल जागतिक बँक समूहाच्या 'दक्षिण आशिया आर्थिक अपडेट'चा एक भाग आहे. तो या क्षेत्रातील आर्थिक घडामोडी आणि भविष्यातील शक्यतांचा आढावा घेतो. अहवाल नियमित जाहीर केला जातो.

  • एआयमधील खासगी गुंतवणूक (२०२५) - ४.१ अब्ज डॉलर (२०२४ मध्ये १.२ अब्ज डॉलर)

  • जीसीसीमधील कर्मचारी संख्या (२०२५) - २३.६ लाख

  • दक्षिण आशियाचा अंदाजे विकास दर (२०२६) - ६.९% (जगातील सर्वात वेगवान वाढणारा प्रदेश)

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in