
माहिती केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री किंजारापू राम मोहन नायडू यांनी शनिवारी दिली. येथे सुरू असलेल्या नारेडकोच्या १७ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाषण करताना नायडू यांनी सांगितले की, न्यूयॉर्क, लंडन आणि हाँगकाँगसारख्या अग्रगण्य विमानतळांचा अभ्यास सुरू असून त्यावरून भारतातील आगामी विमानतळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उपक्रमांना चालना मिळावी, असे सरकारचे उद्दिष्ट आहे.
मंत्र्यांनी नमूद केले की, शेकडो विमानतळ उभारणार नायडू यांनी स्पष्ट केले की, न्यूयॉर्क, लंडन आणि हाँगकाँगच्या विमानतळांच्या परिसरात रिअल इस्टेटसह अनेक आर्थिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर चालतात. या क्षेत्रात प्रचंड वाढीची क्षमता असल्याने सरकार शेकडो नवीन विमानतळ उभारण्याच्या तयारीत आहे. लीकडच्या काळात सरकारने ८८ विमानतळ कार्यान्वित केले आहेत आणि आणखी अनेक नियोजनाधीन आहेत.
विमानतळ हे केवळ मनोरंजनासाठीच नव्हे तर आर्थिक उपक्रमांसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावर लोकांना आकृष्ट करतात. त्यामुळे अशा विमानतळांच्या आसपास अधिवेशन केंद्रे आणि हॉटेल्स उभारण्याचा सरकारचा मानस आहे, ज्यामुळे बहुआयामी आर्थिक फायदा होईल. "मी आंध्र प्रदेश राज्यातून आलो असल्याने नारेडकोचे सदस्य पुढाकार घेऊन नवी राजधानी अमरावती उभी करावी, जी जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज स्मार्ट सिटी असेल," असे नायडू यांनी
सांगितले. यापूर्वी, केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरी कार्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव कुलदीप नारायण यांनी रिअल इस्टेट विकासकांना दरवर्षी ४-५ लाख घरे बांधण्यापेक्षा ४०-५० लाख घरे बांधण्याचे आवाहन केले, जेणेकरून हा क्षेत्र राष्ट्रीय जीडीपीत अधिक महत्त्वाची भर घालेल.
या उपक्रमांसाठीचा निधी रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट्स आणि हुडकोमार्फत उपलब्ध करून द्यायला हवा. भविष्यात बांधकाम क्षेत्रासाठी खरी कसोटी परवडणाऱ्या घरांची व्यवस्थापन तंत्रे विकसित करण्याची असेल, ज्यामध्ये केवळ किरकोळ कर्जापलीकडे लक्ष केंद्रित करावे लागेल, असे ते म्हणाले.
नारेडकोचे अध्यक्ष जी. हरि बाबू म्हणाले की, अमरावती राजधानीच्या उभारणीत नारेडको आपली संपूर्ण ताकद आणि संसाधनांसह आंध्र प्रदेश सरकारसोबत सक्रिय सहभाग घेईल. नारेडकोचे चेअरमन निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की, रिअल इस्टेट क्षेत्राची वाढ ही राष्ट्रीय गरजांशी सुसंगत असली पाहिजे आणि उद्योगाने त्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.