मोदी vs खरगे? इंडिया आघाडीतून पंतप्रधानपदासाठी खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव, तूर्तास निर्णय नाही

या संबंधातील प्रस्ताव तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मांडला असल्याचे सांगण्यात येत
मोदी vs खरगे?  इंडिया आघाडीतून पंतप्रधानपदासाठी खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव, तूर्तास निर्णय नाही
PM

नवी दिल्ली : इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीच्यावतीने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून सादर करण्यात यावे, असा प्रस्ताव सादर केला गेला असल्याचे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंग यांनी मंगळवारी सांगितले.

या संबंधातील प्रस्ताव तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी मांडला असल्याचे सांगण्यात येत आहे. असे झाल्यास राहुल गांधी हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून दूर फेकले जातील. तसेच देशापुढे पहिले दलित पंतप्रधान अशी प्रतिमाही मांडता येईल, दाखविता येईल.  या संबंधातील घडामोडीचे अनेक नेत्यांनी संकेत दिले असले तरी या इंडिया आघाडीच्या चर्चेत प्रथम विजय मिळवणे महत्त्वाचे आणि आणि त्यासाठी आघाडी बळकट करणे गरजेचे आहे, बाकी तो निर्णय नंतर घेता येईल, असे खरगे यांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले.

अन्य सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सदर प्रस्वावावर एकमत झालेले नाही. तर खरगे यांनी मात्र पंतप्रधानपदाचा चेहरा बनण्यास नकार दिला आहे.  मला फक्त वंचितांसाठी काम करायचं आहे. आधी निवडणुकीत  विजय मिळवू नंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवता येईल, असं  त्यांनीत्सांगितल्याचे समजते.

 इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या आजच्या बैठकीत जागावाटप कसे करावे, आघाडीचे समन्वयक गोण, निवडणुकीचा अजेंडा व व्यवस्थापन यावर अधिक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in