‘इंडिया’ आघाडीचा आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा; राहुल गांधींनी दिली माहिती

देशाच्या इतिहासात बहुदा प्रथमच थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. ‘इंडिया आघाडी’तर्फे सोमवारी हा मोर्चा काढला जाणार आहे.
‘इंडिया’ आघाडीचा आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा; राहुल गांधींनी दिली माहिती
‘इंडिया’ आघाडीचा आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा; राहुल गांधींनी दिली माहिती (संग्रहित छायाचित्र)
Published on: 

नवी दिल्ली : देशाच्या इतिहासात बहुदा प्रथमच थेट सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. ‘इंडिया आघाडी’तर्फे सोमवारी हा मोर्चा काढला जाणार आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी ट्विट करून ही माहिती दिली. हा मोर्चा राजकीय पक्षांचा नसून एक भारतीय म्हणून आपण सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणार असून सरन्यायाधीशांना निवेदन देणार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. या मोर्च्यामध्ये आपण पक्ष, लिंग, जात, समुदाय आणि राज्यांच्या भिंती ओलांडून एकत्रित मोर्चा काढणार आहोत. मतचोरी थांबवा, एसआयआर बंदी, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी या संदर्भात देशाच्या सरन्यायाधीशांना निवेदन सादर करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात देशभरात रणकंदन सुरु असतानाच इंडिया आघाडीने हा निर्णय घेतला आहे. देशातील तरुण, सर्व विरोधी पक्ष, नागरी समाज आणि लोकशाहीवरती विश्वास ठेवणारे व भारताच्या संविधानाशी पाठीशी उभे राहणारे सर्वजण आमच्या मोर्चात सामील होतील, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.

हे डरपोक आम्हाला घाबरवू शकत नाहीत

राहुल गांधी यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, नरेंद्र मोदी, अमित शहा, अजय डोवाल, मोहन भागवत हे भारताचा आवाज दाबू शकत नाहीत. हे डरपोक आम्हाला घाबरवू शकत नाहीत. त्यांना माघार घ्यावीच लागेल. आम्ही सर्वजण प्रेम, बंधुभाव आणि देशभक्तीने एकत्र येऊन मोर्चा काढू. घाबरू नका उद्या संपूर्ण भारत सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढेल अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in