भारत बनवणार पाचव्या पिढीचे लढाऊ विमान; निर्मितीसाठी खासगी, सरकारी कंपन्यांची मदत

भारत आणि पाकिस्तान संघर्षात लढाऊ विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारत आतापर्यंत परदेशातून थेट लढाऊ विमाने खरेदी करत आहे. पण, लढाऊ निर्मिती क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आता पाचव्या पिढीचे लढाऊ विमान भारतात बनवण्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी मंजुरी दिली.
भारत बनवणार पाचव्या पिढीचे लढाऊ विमान; निर्मितीसाठी खासगी, सरकारी कंपन्यांची मदत
Published on

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संघर्षात लढाऊ विमानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. भारत आतापर्यंत परदेशातून थेट लढाऊ विमाने खरेदी करत आहे. पण, लढाऊ निर्मिती क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आता पाचव्या पिढीचे लढाऊ विमान भारतात बनवण्यास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी मंजुरी दिली.

प्रगत मध्यम लढाऊ विमान मोहिमेंतर्गत (एएमसीए) ही विमाने बनवली जाणार आहेत. ही मोहीम विमान विकास संस्था उद्योगांच्या मदतीने राबवली जाणार आहे. यात खासगी व सरकारी कंपन्यांना समान संधी मिळणार आहे. विमान विकास संस्थेतर्फे लवकरच स्वारस्य निविदा जारी केल्या जातील.

प्रगत मध्यम लढाऊ विमान हे देशात विकसित होणारे दुसरे लढाऊ विमान आहे. यापूर्वी भारताने एलसीए तेजस व त्याचे पुढील पिढीतील तेजस मार्क-१ तयार केले आहे, तर तेजस मार्क-१-ए वर काम सुरू आहे. हे विमान २०३५ पर्यंत नौदल व हवाई दलाला मिळणार आहे.

एएमसीए प्रकल्पाला एप्रिल २०२४ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीने मंजुरी दिली. ५ व्या पिढीचे स्वदेशी लढाऊ विमानाच्या डिझाईन व विकासासाठी १५ हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली. विमान विकास संस्था ही या मोहिमेकडे विमानाचे डिझाईन व परिचलनाची जबाबदारी आहे. ही संस्था डीआरडीओ अंतर्गत येते.\

हे विमान भारतीय हवाई दलाच्या अन्य लढाऊ विमानापेक्षा अधिक चांगले असेल. शत्रूच्या रडारपासून वाचण्यासाठी उच्च तंत्रज्ञानयुक्त स्टेल्थ तंत्रज्ञानाचा वापर त्यात केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरात असलेल्या पाचव्या पिढीच्या अन्य स्टेल्थ लढाऊ विमानापेक्षा हे अधिक चांगले असेल.

या विमानाची वैशिष्ट्ये

  • दोन इंजिनाचे बहुद्देशीय लढाऊ विमान

  • ६५ हजार उंचीवरून उडण्याची क्षमता

  • वजन २५ टन

  • ७ हजार किलो स्फोटके वहन क्षमता

  • एकदा इंधन भरल्यावर

  • ३२४० किमीचा पल्ला

  • २०३५ पर्यंत हवाई दल, नौदलाला मिळणार

logo
marathi.freepressjournal.in