भारताने रशियाकडून केली कोळशाच्या आयातीत मोठी वाढ

भारत रशियाकडूनही विक्रमी पातळीवर कच्चे तेल आयात करत आहे.
 भारताने रशियाकडून केली कोळशाच्या आयातीत मोठी वाढ

भारताने या वर्षी जूनच्या पहिल्या २० दिवसांत रशियाकडून ३३१.१० दशलक्ष डॉलर्स मूल्याचा कोळसा आयात केला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत हे प्रमाण सहापट जास्त आहे. याशिवाय भारत रशियाकडूनही विक्रमी पातळीवर कच्चे तेल आयात करत आहे.

आकडेवारीनुसार, भारताचा रशियासोबतचा तेल व्यापार २० दिवसांत ३१ पटीने वाढून २.२२ अब्ज डॉलर्स झाला आहे. या कालावधीत तेल खरेदीची सरासरी दररोज १११.०८ दशलक्ष डॉलर्स होती, जी मागील तीन महिन्यांत खर्च केलेल्या ३१.१ दशलक्ष डॉलर्सपेक्षा तिप्पट आहे.

जागतिक निर्बंध असूनही, भारताने रशियाकडून कोळशाच्या आयातीत मोठी वाढ केली आहे. विशेष म्हणजे रशिया भारताला कोळशावर ३० टक्क्यांपर्यंत सवलत देत आहे. अनेक देशांनी निर्बंध लादूनही भारताने रशियाशी कोणताही व्यापार बंद केलेला नाही.

युक्रेनमधील हिंसाचार संपलाच पाहिजे, असे भारताने म्हटले आहे. परंतु रशियाकडून वस्तूंची खरेदी अचानक थांबवल्यास जागतिक किमतींमध्ये अस्थिरता निर्माण होईल आणि ग्राहकांना त्रास होईल. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी भारताला सांगितले आहे की, रशियाकडून इंधन आयात करण्यावर कोणतीही बंदी नाही पण त्याला जास्त गती देऊ नये. त्याच वेळी युरोपियन व्यापाऱ्यांनी रशियाशी व्यापार बंद केला, त्याचा फायदा थेट भारतीय खरेदीदार घेत आहेत. वाहतूक खर्च जास्त असूनही ते रशियाकडून मोठ्या प्रमाणावर कोळसा खरेदी करत आहेत. भारताने तीन आठवड्यांसाठी दररोज सरासरी १२८.६२ रुपये (१६.५५ दशलक्ष डॉलर्स) रशियन कोळसा खरेदी केला आहे. २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या रशिया-युक्रेन युद्धानंतर तीन महिन्यांत खरेदी केलेल्या ७७.१ दशलक्ष डॉलर्सच्या तुलनेत हे दुप्पट आहे. गेल्या २० दिवसांच्या कालावधीत तेल खरेदीची सरासरी प्रतिदिन ८६३.७० रुपये (११०.८६ दशलक्ष डॉलर्स) झाली. भारतातील आर्थिक घडामोडी पुन्हा सुरू झाल्यामुळे आणि उन्हाळ्यात वाढत्या मागणीमुळे, वीज निर्मिती कंपन्यांवर अधिक ऊर्जा निर्माण करण्याचा दबाव आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in