भारताची रशिया, यूएईकडून तेल खरेदीत मोठी वाढ; होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत होण्यापूर्वीचा दिलासा

रशियाकडून भारताची कच्चे तेल आयात जून महिन्यात झपाट्याने वाढली आहे. तर संयुक्त अरब अमिरातीकडून झालेली आयातही विक्रमी पातळीच्या जवळ पोहोचली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा उघडल्यानंतर आखाती देशांकडून पुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यापूर्वी भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी पुरवठा सुरक्षित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही वाढ झाली असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.
भारताची रशिया, यूएईकडून तेल खरेदीत मोठी वाढ; होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत होण्यापूर्वीचा दिलासा
भारताची रशिया, यूएईकडून तेल खरेदीत मोठी वाढ; होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत होण्यापूर्वीचा दिलासा'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी दिल्ली : रशियाकडून भारताची कच्चे तेल आयात जून महिन्यात झपाट्याने वाढली आहे. तर संयुक्त अरब अमिरातीकडून झालेली आयातही विक्रमी पातळीच्या जवळ पोहोचली आहे. होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा उघडल्यानंतर आखाती देशांकडून पुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यापूर्वी भारतीय तेल शुद्धीकरण कंपन्यांनी पुरवठा सुरक्षित करण्याचा प्रयत्न केल्यामुळे ही वाढ झाली असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.

'केपलर' या सागरी आणि कमोडिटी इंटेलिजन्स फर्मच्या आकडेवारीनुसार, भारताने १ ते १९ जून या कालावधीत रशियाकडून सरासरी २६.६ लाख बॅरल प्रति दिन कच्चे तेल आयात केले. ते मे महिन्यातील १९.१ लाख बॅरल प्रति दिन होते. यामुळे भारताचा सर्वात मोठा तेल पुरवठादार म्हणून मॉस्कोचे (रशिया) स्थान अधिक मजबूत झाले आहे. जूनमध्ये (१९ जूनपर्यंत) संयुक्त अरब अमिरातीकडून झालेली आयात ६,३६,००० बॅरल प्रति दिन राहिली. ती मेमधील ६,४४,००० बॅरल प्रति दिन या विक्रमी आयातीपेक्षा काही प्रमाणात कमी आहे. व्हेनेझुएला हा भारताचा चौथा मोठा कच्चे तेल पुरवठादार म्हणून समोर आला असून तिथून २,०९,००० बॅरल प्रति दिन आयात झाली आहे. या यादीत सौदी अरेबिया ३,८४,००० बॅरल्स प्रति दिन सह तिसऱ्या स्थानावर आहे. केपलरनुसार, अमेरिकेकडून होणारी आयात मेमधील २,५२,००० बॅरल प्रति दिनवरून जूनमध्ये ९१,००० बॅरल प्रति दिनपर्यंत लक्षणीयरीत्या घसरली आहे.

logo
marathi.freepressjournal.in