चंदिगडमध्ये इंडिया आघाडी पराभूत; महापौरपदी भाजपचे मनोजकुमार सोनकर

काँग्रेस आणि आप यांची आठ मते अवैध ठरवण्यात आल्यामुळे भाजप विजयी होऊ शकला, अशी टीका काँग्रेस व आप यांच्या आघाडीने केली आहे.
 चंदिगडमध्ये इंडिया आघाडी पराभूत; महापौरपदी भाजपचे मनोजकुमार सोनकर

चंदिगड : इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर चंदिगड शहराच्या महापौर निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि इंडिया आघाडीचा पहिला सामना मंगळवारी झाला. त्यात भाजपचा विजय झाला. मात्र काँग्रेस आणि आप यांची आठ मते अवैध ठरवण्यात आल्यामुळे भाजप विजयी होऊ शकला, अशी टीका काँग्रेस व आप यांच्या आघाडीने केली आहे.

पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाने आणि प्रचंड वादानंतर चंदिगड महापौरपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. चंदिगडच्या महापौरपदाच्या या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मनोजकुमार सोनकर विजयी झाले. भाजपच्या मनोजकुमार सोनकर यांनी आप-काँग्रेसचे संयुक्त उमेदवार कुलदीप सिंग यांचा पराभव केला. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाने आणि प्रचंड वादानंतर चंदीगड महापौरपदासाठी मंगळवारी निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेस आणि आप यांची आठ मते अवैध ठरवण्यात आल्याने भाजपचा विजय झाला आहे.

या निवडणुकीला इंडिया आघाडीची लिटमस टेस्ट समजले जात होते. यातच पहिल्याच इंडिया आघाडीच्या निवडणुकीत त्यांना अपयशाचा सामना करावा लागला आहे.

दरम्यान, येथील महापौर निवडणुकीत बाद मतांमुळे भाजपला मिळालेला विजय इंडिया आघाडीतील घटक पक्ष आम आदमी पक्षाच्या जिव्हारी लागला असून फेरनिवडणुकीसाठी या पक्षाने न्यायालयात धाव घेतली आहे.

महापौर निवडणूक उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशाच्या देखरेखीखाली पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी आम आदमी पक्षाकडून करण्यात आली आहे. चंदिगड निवडणुकीत आम आदमी पक्ष व कॉंग्रेस या इंडिया आघाडीतील दोन प्रमुख घटक पक्षांची आघाडी होती. तरी देखील भाजपचा उमेदवार या निवडणुकीत विजयी झाला. पीठासीन अधिकाऱ्याने मतपत्रिकेत छेडछाड केल्याचा आरोप आप पक्षाकडून करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in