लष्करासाठी २.१२ लाख कोटींची शस्त्र खरेदी; केंद्र सरकारची मंजुरी, लढाऊ क्षमता अनेक पटींनी वाढणार

देशाच्या संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्र सरकारने सोमवारी लष्करासाठी तब्बल २.१२ लाख कोटी रुपयांच्या लष्करी हार्डवेअर आणि शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी दिली आहे.
लष्करासाठी २.१२ लाख कोटींची शस्त्र खरेदी; केंद्र सरकारची मंजुरी, लढाऊ क्षमता अनेक पटींनी वाढणार
लष्करासाठी २.१२ लाख कोटींची शस्त्र खरेदी; केंद्र सरकारची मंजुरी, लढाऊ क्षमता अनेक पटींनी वाढणार प्रातिनिधिक छायाचित्र
Published on: 

नवी दिल्ली : देशाच्या संरक्षण दलाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केंद्र सरकारने सोमवारी लष्करासाठी तब्बल २.१२ लाख कोटी रुपयांच्या लष्करी हार्डवेअर आणि शस्त्रास्त्र खरेदीला मंजुरी दिली आहे. यामध्ये हलकी मल्टी-रोल हेलिकॉप्टर्स, लांब पल्ल्याचे 'कामिकेझे' ड्रोन आणि रडारसारख्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचा समावेश असून, त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांची लढाऊ क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे.

संरक्षण मंत्रालयाची सर्वोच्च निर्णय संस्था असलेल्या 'डिफेन्स ॲक्विझिशन कौन्सिल'च्या बैठकीत हे खरेदी प्रस्ताव मंजूर करण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, डीएसीने सुमारे २ लाख १२ हजार कोटी रुपयांच्या विविध भांडवली अधिग्रहण प्रस्तावांना 'ॲक्सेप्टन्स ऑफ नेसेसिटी' म्हणजेच तत्त्वतः प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

लष्करी ताकद वाढवण्यासाठी खरेदी

भारतीय लष्कराची ताकद वाढवण्यासाठी उच्च गतिशीलता वाहने, स्वयंचलित ट्रॅक्ड गन सिस्टीम, गन शॉट रिस्पॉन्स सिस्टम, हलकी मल्टी-रोल हेलिकॉप्टर्स, अतिशय कमी पल्ल्याची हवाई संरक्षण यंत्रणा आणि मानवरहित हवाई यंत्रणाविरोधी यंत्रणा खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच, लष्करासाठी इतर मानवरहित हवाई प्रणाली, पाळत ठेवणारी हवाई वाहने, एकात्मिक पाळत ठेवणे आणि स्ट्राइक सिस्टीम तसेच लांब पल्ल्याच्या 'कामिकेझे' ड्रोन प्रणालीच्या अधिग्रहणालाही डीएसीने हिरवा कंदील दाखवला आहे.

नौदल, हवाई दलासाठी खरेदी

भारतीय नौदल: नौदलासाठी 'ॲक्टिव्ह ऑफबोर्ड डिकॉय सिस्टम' आणि इतर प्रमुख नौदल प्लॅटफॉर्म खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विशेषतः शत्रूच्या आधुनिक क्षमतेच्या अँटी-शिप क्षमतेविरुद्ध नौदलाचे क्षेपणास्त्रविरोधी संरक्षण अधिक मजबूत होईल. हवाई संरक्षण आणि युद्धक्षमता वाढवण्यासाठी हेलिकॉप्टर्स, हवाई संरक्षण प्रणाली, शस्त्रे आणि मोबाइल एक्स-बँड डॉप्लर वेदर रडार सिस्टीम खरेदी केली जाईल.

शस्त्रास्त्रांची वैशिष्ट्ये

उच्च गतिशीलता वाहने दुर्गम भागात रसद पुरवठा आणि मोहिमा सुलभ करण्यासाठी उपयुक्त ठरतील, गन शॉट रिस्पॉन्स सिस्टम रिअल-टाइम परिस्थितीची माहिती देऊन 'फोर्स मल्टिप्लायर' म्हणून काम करेल, हलकी मल्टी-रोल हेलिकॉप्टर्स लष्करासोबतच भारतीय हवाई दलासाठीही गस्त घालणे, शोध आणि बचाव मोहीम, तसेच आपत्कालीन मदतकार्यासाठी वापरली जातील.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in