भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुनरुच्चार

भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून आम्ही दहाव्या स्थानावरून पहिल्या पाचात आलो आहोत. लवकरच आम्ही पहिल्या तीन क्रमांकामध्ये येऊ. ही क्षमता आम्हाला सुधारणा, कामगिरी व बदल यातून मिळाली आहे. देशाने केलेल्या कामगिरीचा झेंडा आकाशात फडकत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणारी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुनरुच्चार
Photo : X (Narendra Modi)
Published on

बेंगळुरू : भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असून आम्ही दहाव्या स्थानावरून पहिल्या पाचात आलो आहोत. लवकरच आम्ही पहिल्या तीन क्रमांकामध्ये येऊ. ही क्षमता आम्हाला सुधारणा, कामगिरी व बदल यातून मिळाली आहे. देशाने केलेल्या कामगिरीचा झेंडा आकाशात फडकत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

कर्नाटक दौऱ्यात पंतप्रधानांनी तीन ‘वंदे भारत’चे व विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन केले. या प्रकल्पांची किंमत २२ हजार कोटी रुपये आहे.

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३१ जुलै रोजी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावले. तसेच भारत व रशिया यांना मृत अर्थव्यवस्था म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मोदींनी ट्रम्प यांना अप्रत्यक्ष टोला हाणला.

‘ऑपरेशन सिंदूर’वर बोलताना ते म्हणाले की, भारतीय सैनिकांनी दहशतवादी व पाकिस्तानला गुडघे टेकायला लावले. यामागे आमचे तंत्रज्ञान व भारतीय बनावटीच्या शस्त्रास्त्रांची ताकद आहे. यात बंगळुरूच्या तरुणांचे मोठे योगदान आहे.

यावेळी ऑरेंज मार्गिकेचे भूमिपूजन त्यांनी केले. ‘यलो’ व ‘ऑरेंज लाईन’मुळे २५ लाख लोकांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बेंगलुरु मेट्रोसाठी इन्फोसिससहित मोठ्या कंपन्यांनी निधी दिला आहे.

भारत जागतिक स्तरावर ‘एआय’च्या क्षेत्रात वेगाने वाटचाल करत आहे. लवकरच भारतात बनवलेली चिप मिळू शकेल. २०१४ पूर्वी भारताची इलेक्ट्रॉनिक निर्यात ६ अब्ज डॉलर्स होती. ती आता ३८ अब्ज डॉलर्सवर गेली. तर वाहन निर्यात १६ अब्ज डॉलर होती. ती आता दुप्पट झाली आहे, असे ते म्हणाले.

तीन ‘वंदे भारत ट्रेन’ना हिरवा झेंडा

पंतप्रधान मोदी यांनी बंगळुरूच्या केएसआर रेल्वे स्टेशनवर तीन ‘वंदे भारत एक्सप्रेस’ना हिरवा झेंडा दाखवला. बंगळुरू ते बेळगावी, अमृतसर ते श्री माता वैष्णोदेवी कटरा आणि नागपूर ते पुणे या ‘वंदे भारत’ ट्रेनचा यामध्ये समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in