नियम धाब्यावर बसवूनच पाकचा अणुकार्यक्रम; भारताच्या परराष्ट्र खात्याचा आरोप

गेली अनेक दशके पाकिस्तानचा अणुकार्यक्रम कायमच नियम धाब्यावर बसवून सुरू आहे, असा आरोप भारताच्या परराष्ट्र खात्याने केला आहे.
नियम धाब्यावर बसवूनच पाकचा अणुकार्यक्रम; भारताच्या परराष्ट्र खात्याचा आरोप
नियम धाब्यावर बसवूनच पाकचा अणुकार्यक्रम; भारताच्या परराष्ट्र खात्याचा आरोपछायाचित्र : एएनआय
Published on

नवी दिल्ली : गेली अनेक दशके पाकिस्तानचा अणुकार्यक्रम कायमच नियम धाब्यावर बसवून सुरू आहे, असा आरोप भारताच्या परराष्ट्र खात्याने केला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानकडून अण्वस्त्र चाचण्या होत असल्याची माहिती दिली होती.

त्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, गुप्त आणि बेकायदेशीर अणुकार्यक्रम हे पाकिस्तानच्या इतिहासाशी सुसंगत आहे. जो दशकानुदशके चाललेल्या तस्करी, निर्यात नियंत्रण उल्लंघन आणि गुप्त भागीदारींवर आधारित आहे.

‘भारताने नेहमीच आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष पाकिस्तानच्या या पार्श्वभूमीकडे वेधले आहे. या पार्श्वभूमीवर, आम्ही अध्यक्ष ट्रम्प यांनी पाकिस्तानच्या अणुचाचणीबाबत केलेल्या विधानाची नोंद घेतली आहे,’ असे त्यांनी नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in