भारत-ग्रीस नौदल सराव करणार

पहिल्यांदाच भारतीय नौदल ग्रीसच्या नौदलासोबत द्विपक्षीय सराव करणार आहे. या सरावात भारतीय नौदलाच्या युद्धनौका आयएनएस त्रिकंठ सहभागी होणार आहे. आतापर्यंत ग्रीससोबत भारतीय नौदलाने फक्त ‘पासेज एक्सरसाइज’ केली होती. आता ही द्विपक्षीय सरावमालिका अधिकृतपणे स्थापन केली जाणार असून पुढे दरवर्षी हा सराव होऊ शकेल.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

नवी दिल्ली : पहिल्यांदाच भारतीय नौदल ग्रीसच्या नौदलासोबत द्विपक्षीय सराव करणार आहे. या सरावात भारतीय नौदलाच्या युद्धनौका आयएनएस त्रिकंठ सहभागी होणार आहे. आतापर्यंत ग्रीससोबत भारतीय नौदलाने फक्त ‘पासेज एक्सरसाइज’ केली होती. आता ही द्विपक्षीय सरावमालिका अधिकृतपणे स्थापन केली जाणार असून पुढे दरवर्षी हा सराव होऊ शकेल. हा सराव १३ ते १८ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. हा केवळ लष्करी सराव नसून भारत आणि ग्रीस यांच्यातील धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करण्याचा एक टप्पा आहे.

तुर्कीयेने ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानला साथ दिली होती. पाकिस्तानला तुर्कीयेने ड्रोन उपलब्ध करून दिले होते, ज्यांचा वापर भारतावर हल्ला करण्यासाठी पाकिस्तान करत होता. भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने त्या तुर्कीये ड्रोनना पाडले होते. पाकिस्तान हे ड्रोन गुप्तचर कारवायांसाठी आणि आत्मघाती हल्ल्यांसाठी वापरत होता. तुर्कीयेच्या परराष्ट्र मंत्रालयाने ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानच्या बाजूने विधाने केली होती. त्यानंतर भारतात तुर्कीयेबाबत मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त झाली आणि ‘बायकॉट तुर्की’ मोहिम राबवली गेली. तुर्की हा पाकिस्तानचा धोरणात्मक भागीदार आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर जून महिन्यात भारतीय वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंह यांनीही ग्रीसला भेट दिली होती.

ग्रीससोबत भारताची वाढती सामरिक मैत्री महत्त्वाची मानली जाते. कारण तुर्कीये आणि ग्रीस यांच्यात जुना वाद आहे. या कारणामुळे हे दोन्ही देश नाटोचे सदस्य असूनही अनेकदा युद्धाच्या उंबरठ्यावर आले आहेत. एजियन समुद्रातील समुद्री सीमांबाबत, विशेषतः एक्सक्लूसिव इकॉनॉमिक झोनसंदर्भात, ग्रीस आणि तुर्कीमध्ये वाद आहे. तुर्कीचा दावा आहे की ग्रीक बेटांना पूर्ण एक्सक्लूसिव इकॉनॉमिक झोनचा अधिकार नसावा, तर ग्रीस संयुक्त राष्ट्र समुद्र कायदा कराराच्या आधारे आपल्या बेटांसाठी पूर्ण समुद्री क्षेत्राचा दावा करतो.

याशिवाय, ग्रीसचा दावा आहे की त्याचे हवाई क्षेत्र १० सागरी मैलांपर्यंत आहे, परंतु तुर्कीये फक्त ६ सागरी मैल मान्य करतो. यामुळे हवाई उल्लंघनाचे आरोप वारंवार होत असतात.

तुर्कीये - ग्रीस वाद

ग्रीससोबत भारताची वाढती सामरिक मैत्री महत्त्वाची मानली जाते. कारण तुर्कीये आणि ग्रीस यांच्यात जुना वाद आहे. या कारणामुळे हे दोन्ही देश नाटोचे सदस्य असूनही अनेकदा युद्धाच्या उंबरठ्यावर आले आहेत. कारण दोन्ही देशांमध्ये समुद्र आणि हवाई हद्दीवरून जुने वाद आहेत.

logo
marathi.freepressjournal.in