जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारताने घेतली झेप

आर्थिक आघाडीवरील कामगिरीत सुधारणा झाल्यामुळे भारताची स्थिती सुधारली आहे.
 जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारताने घेतली झेप

इंस्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंटच्या (आयएमडी) वार्षिक जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांकात भारताने सहा स्थानांवर झेप घेतली आहे. आशियाई अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात वेगाने रुळावर येणारा देश भारत ठरला आहे. निर्देशांकात भारत ४३व्या क्रमांकावरून ३७व्या स्थानावर पोहोचला आहे. आर्थिक आघाडीवरील कामगिरीत सुधारणा झाल्यामुळे भारताची स्थिती सुधारली आहे.

चांगली कामगिरी करणाऱ्या आशियाई अर्थव्यवस्थांमध्ये सिंगापूर तिसऱ्या, हाँगकाँग पाचव्या, तैवान सातव्या, चीन १७व्या आणि ऑस्ट्रेलिया १९व्या क्रमांकावर आहे. एका जागतिक अभ्यासानुसार डेन्मार्कने ६३ देशांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. गेल्या वर्षी ते तिसऱ्या क्रमांकावर होते तर स्वित्झर्लंड पहिल्या क्रमांकावरून दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहे. त्याचवेळी सिंगापूर पाचव्या क्रमांकावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. निर्देशांकातील शीर्ष १० देश स्वीडन चौथ्या, हाँगकाँग एसए्आर पाचव्या, नेदरलँड सहाव्या, तैवान सातव्या, फिनलंड आठव्या, नॉर्वे नवव्या आणि यूएसए दहाव्या क्रमांकावर आहेत. क्रिस्टोस कॅबोलिस,आयएमडीच्या सेंटर फॉर ग्लोबल कॉम्पिटिटिव्हनेसचे अर्थशास्त्रज्ञ म्हणाले की, २०२१मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख कर सुधारणांमुळे व्यापारी समुदायाला आत्मविश्वास पुन्हा मिळाला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in