नवी दिल्ली : भूकंपाचा फटका बसलेल्या व्हेनेझुएलाला मदत करण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन अमिस्ताद’ सुरू केले आहे.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी माहिती दिली की, भारतीय हवाई दलाची दोन सी-१७ विमाने एक फील्ड हॉस्पिटल युनिट आणि ३५ टनांहून अधिक मदत साहित्य घेऊन व्हेनेझुएलासाठी रवाना झाली आहेत. यात औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि दोन ‘भीष्म’ क्युब्जचा समावेश आहे. हे क्यूब्स आपत्तीच्या वेळी जलद वैद्यकीय मदत देण्यासाठी तयार करण्यात आले आहेत.
दरम्यान, भूकंपामुळे व्हेनेझुएलामध्ये मृतांचा आकडा २३५ वर पोहोचला असून ४,३०० जण जखमी झाले आहेत. ३९ हजार जण बेपत्ता झाले आहेत. अनेक गंभीर जखमींवर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.