देशात बिबटे वाढले, पण शिवालिकमध्ये संख्या घटली

संपूर्ण भारतात २०१८ ते २०२२ दरम्यान बिबट्यांची संख्या १.०८ टक्क्याने वाढली, तर शिवालिकचा डोंगराळ प्रदेश व गंगेच्या प्रदेशात ही संख्या...
देशात बिबटे वाढले, पण शिवालिकमध्ये संख्या घटली
Published on

नवी दिल्ली : भारतात बिबट्यांची संख्या चार वर्षांत १३८७४ झाली आहे. २०१८ मध्ये देशात बिबट्यांची संख्या १२,८५२ होती, तर २०१८-२४ दरम्यान शिवालिकच्या डोंगरात व सिंधु-गंगेच्या खोऱ्यात गुलाबी मांजराची संख्या कमी झाली आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ‘भारतातील बिबट्यांची संख्या’ या विषयावर अहवाल सादर केला.

ते म्हणाले की, मध्य प्रदेशात बिबट्यांची संख्या अधिक आहे. २०२२ गणनेनुसार मध्य प्रदेशात ३९०७ बिबटे आहेत, तर २०१८ मध्ये तेथे ३४२१ बिबटे आढळले. कर्नाटकात बिबट्यांची संख्या १८७९ व तामिळनाडूत १०७० झाली, असे यादव म्हणाले.

पर्यावरण खात्याने सांगितले की, बिबट्यांची संख्या मध्य भारतात वाढली आहे. २०१८ मध्ये ८०१७ होते. हीच संख्या २०२२ मध्ये ८८२० बिबटे आढळले.

शिवालिकमध्ये संख्या घटली

संपूर्ण भारतात २०१८ ते २०२२ दरम्यान बिबट्यांची संख्या १.०८ टक्क्याने वाढली, तर शिवालिकचा डोंगराळ प्रदेश व गंगेच्या प्रदेशात ही संख्या ३.४ टक्क्याने घटली. मध्य भारत आणि पूर्व घाट क्षेत्रात बिबट्यांची संख्या १.५ टक्क्याने वाढली. सरकारच्या अहवालानुसार, सर्वात जास्त बिबटे नागार्जुनसागर श्रीशैलम (आंध्र प्रदेश), पन्ना (मध्य प्रदेश) व सातपुडा (मध्य प्रदेश) मध्ये आढळले आहेत. बिबट्यांच्या संख्येची गणना १८ राज्यांतील व्याघ्र प्रकल्पावर केंद्रित आहेत. त्यातील चार प्रदेश हे वाघ संरक्षण अभयारण्यात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in