भारताची मालदीवला जीवनावश्यक वस्तूंची मदत

भारताने तांदूळ, साखर व कांदा निर्यातीला बंदी घातली आहे. कारण देशात निवडणूक सुरू आहेत. त्यामुळे देशात जीवनावश्यक वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार पावले उचलत आहे.
भारताची मालदीवला जीवनावश्यक वस्तूंची मदत
Published on

नवी दिल्ली : भारत आणि मालदीवमध्ये तणाव निर्माण झालेला असतानाच भारताने मालदीवला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास मंजुरी दिली आहे. साखर, गहू, तांदूळ व कांदा यांच्यासहित जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यास परवानगी देण्यात आली आहे.

सध्या चीनच्या वाढत्या प्रभावामुळे भारत व मालदीवचे संबंध तणावपूर्ण बनले आहेत. भारताने तांदूळ, साखर व कांदा निर्यातीला बंदी घातली आहे. कारण देशात निवडणूक सुरू आहेत. त्यामुळे देशात जीवनावश्यक वस्तूंवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार पावले उचलत आहे.

भारताने मालदीवला १२४,२१८ मेट्रिक टन तांदूळ, १०९१६२ टन गव्हाचे पीठ, ६४,४९४ टन साखर, २१५१३ टन बटाटा, ३५७४९ टन कांदा व ४२७.५ दशलक्ष अंड्यांच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. तसेच भारताने दगड व नदीतील वाळू निर्यातीला परवानगी दिली आहे. मालदीवला १ दशलक्ष टन निर्यात केली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in