भारतात AI चा दैनंदिन वापर दुपटीने वाढणार; २०३० पर्यंत एआयचा उपयोग ४३ टक्क्यांपर्यंत जाणार

भारतातील मल्टिमोडल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) दैनंदिन वापर सध्याच्या २२ टक्क्यांवरून वाढून २०३० पर्यंत जवळपास दुप्पट म्हणजेच ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
भारतात AI चा दैनंदिन वापर दुपटीने वाढणार; २०३० पर्यंत एआयचा उपयोग ४३ टक्क्यांपर्यंत जाणार
भारतात AI चा दैनंदिन वापर दुपटीने वाढणार; २०३० पर्यंत एआयचा उपयोग ४३ टक्क्यांपर्यंत जाणार
Published on: 

नवी दिल्ली : भारतातील मल्टिमोडल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा (एआय) दैनंदिन वापर सध्याच्या २२ टक्क्यांवरून वाढून २०३० पर्यंत जवळपास दुप्पट म्हणजेच ४३ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

एरिक्सन कन्झ्युमरलॅबच्या अहवालानुसार भारतासाठीचा अंदाजित दर सध्याच्या १० टक्क्यांवरून २०३० पर्यंत ३० टक्क्यांपर्यंत पोहोचणाऱ्या जागतिक अंदाजापेक्षा जास्त आहे.

मल्टिमोडल एआय वापरामध्ये मजकूर, आवाज, प्रतिमा आणि व्हिडीओचा समावेश होतो. एआयचा वापर केवळ क्वचित प्रसंगी करण्याऐवजी आता उपकरणांवर आणि ठिकाणांहून अधिक वारंवार केला जात आहे, ज्यामुळे मोबाईल नेटवर्कवर नवीन आव्हाने व मागण्या निर्माण होत आहेत, असे अहवालात म्हटले आहे. ग्राहक एआय सेवांवर अधिक प्रतिमा, व्हिडीओ व व्हॉईस शेअर करतील तेव्हा नेटवर्क ट्रॅफिक हे अपलोड-हेवी, विषम रीतीने वितरित होणारे बनेल, असे अहवालात म्हटले आहे.

जागतिक स्तरावर वापर ३० टक्क्यांपर्यंत पोहोचेल

जागतिक स्तरावर, सध्या एआय 'सुपर युजर्स'चे प्रमाण ग्राहकांच्या १० टक्के आहे. परंतु २०३० पर्यंत ते ३० टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची आणि सर्व एआय अ‍ॅक्टिव्हिटीपैकी ८० टक्क्यांहून अधिक भाग निर्माण करण्याची अपेक्षा आहे. अशा वापरकर्त्यांसाठी, सरासरी वापरकर्त्यांच्या तुलनेत नेटवर्कच्या समाधानावर प्रतिसाद वेळेचा प्रभाव अडीच पट अधिक असतो. २०३० पर्यंत, जागतिक स्तरावर मल्टिमोडल एआयचा दैनंदिन वापर, एकाधिक उपकरणांवर होणारा एआयचा वापर आणि प्रवासात ज्या ठिकाणांवरून एआयचा वापर केला जातो, त्या ठिकाणांची संख्या या सर्व बाबी तिप्पट होण्याची अपेक्षा आहे.

अहवालात 'एजन्टिक एआय'च्या वाढत्या वापराकडेही लक्ष वेधले आहे. हे एआय वापरकर्त्यांसाठी बुकिंग करणे, उत्पादनांची तुलना करणे किंवा वेळापत्रक व्यवस्थापित करणे यांसारखी कामे पार पाडू शकते. सर्वेक्षण केलेल्या बाजारपेठांमध्ये ३८ टक्के स्मार्टफोन वापरकर्त्यांना सध्याच्या ४ टक्क्यांच्या तुलनेत २०३० पर्यंत एजंटटिक एआय वापरण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे दररोज एक तास स्क्रीन टाइम वाचेल अशी त्यांना आशा आहे.

दररोज एआय वापरणाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक लोकांना बनावट किंवा हॅक केलेल्या एआय असिस्टंटबद्दल तीव्र चिंता आहे आणि अशा असिस्टंटची ओळख पटवण्यासाठी दूरसंचार सेवा पुरवठादारांना सर्वाधिक विश्वासार्ह मानले गेले आहे. अहवाल भारतसंहित २७ बाजारपेठांमधील १५ ते ६९ वयोगटातील ४३,००० हून अधिक स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या प्रतिसादांवर आधारित आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in