श्रीनगर : भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे काश्मीरमधील शैक्षणिक संस्था बंद करण्यास भाग पाडले जात असल्याने, विद्यार्थ्यांचा मौल्यवान शैक्षणिक वेळ वाया जाऊ नये म्हणून अनेक शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत.
पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर ७ मे पासून शाळा बंद असल्याने खोऱ्यातील आघाडीच्या खाजगी शाळांनी शुक्रवारी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन वर्ग सुरू केले.
माझ्या मुलांना आजपासून ऑनलाइन शिक्षण मिळू लागले आहे. कारण सध्या घराबाहेर पडणे सुरक्षित नाही, दोन मुलांची आई सबा भट यांनी सांगितले. सबाची दोन्ही मुले पुलवामा जिल्ह्यातील पंपोर भागातील एका आघाडीच्या खाजगी शाळेत विद्यार्थी आहेत.