India Pakistan Tension : पाकिस्तानने चुकीची माहिती दिली

India Pakistan Tension : पाकिस्तानने चुकीची माहिती दिली

भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामावर एकमत झाल्यानंतर भारतीय लष्कराने शनिवारी सायंकळी पत्रकार परिषद घेऊन शस्त्रविरामाची माहिती दिली. तसेच पाकिस्तानने केलेल्या अनेक खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला.
Published on

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविरामावर एकमत झाल्यानंतर भारतीय लष्कराने शनिवारी सायंकळी पत्रकार परिषद घेऊन शस्त्रविरामाची माहिती दिली. तसेच पाकिस्तानने केलेल्या अनेक खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला.

कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पाकिस्ताननं गेल्या दोन दिवसांत केलेले अनेक दावे खोडून काढले. सोफिया कुरेशी म्हणाल्या की, “पाकिस्तानच्या जेएफ १७ ने भारताच्या एस-४०० आणि ब्रह्मोस क्षेपणास्त्र तळांना नुकसान पोहोचवले, हे पूर्णपणे चुकीचे आहे. पाकिस्तानने भारताचे ब्रह्मोस मिसाईलदेखील पाडल्याचा दावा केला होता. हा दावाही पूर्णपणे अयोग्य आहे. लष्कराने भारताच्या सिरसा, जम्मू, पठाणकोट, भटिंडा, नलिया आणि भुज या ठिकाणच्या हवाई दलाच्या तळांवर हल्ले चढवले आणि त्यांचे नुकसान केले. पण या तळांचे कोणतेही नुकसान झाले नसून भारताने पाकिस्तानचे प्रत्येक हल्ले यशस्वीरीत्या परतवून लावले आहेत.”

या पत्रकार परिषदेत कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यासोबत कमांडर रवी नायरदेखील उपस्थित होते. “आम्ही शस्त्रसंधीचे पालन करू. आम्ही पूर्णपणे सज्ज राहू तसेच कायम सतर्क असू. भारताचे सार्वभौमत्व आणि अखंडता कायम राखण्यासाठी आम्ही बांधील आहोत. आत्तापर्यंत पाकिस्तानकडून कोणत्याही प्रकारच्या आततायी कारवाईवर पूर्ण ताकदीने भारताने उत्तर दिलं आहे. यापुढेही पाकिस्तानने चुकीचे पाऊल उचलले गेले तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in