भारत-रशियादरम्यान आर्थिक रोडमॅप; १०० अब्ज डॉलरचे द्विपक्षीय व्यापार लक्ष्य पाच वर्षांत गाठणार

भारत आणि रशियाने शुक्रवारी वॉशिंग्टनच्या निर्बंधात्मक टॅरिफ व निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व व्यापार-संबंध सुधारण्यासाठी पुढील पाच वर्षांचा योजना आराखडा तयार केला.
भारत-रशियादरम्यान आर्थिक रोडमॅप; १०० अब्ज डॉलरचे द्विपक्षीय व्यापार लक्ष्य पाच वर्षांत गाठणार
भारत-रशियादरम्यान आर्थिक रोडमॅप; १०० अब्ज डॉलरचे द्विपक्षीय व्यापार लक्ष्य पाच वर्षांत गाठणारPhoto- X (@narendramodi)
Published on

नवी दिल्ली : भारत आणि रशियाने शुक्रवारी वॉशिंग्टनच्या निर्बंधात्मक टॅरिफ व निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर आर्थिक व व्यापार-संबंध सुधारण्यासाठी पुढील पाच वर्षांचा योजना आराखडा तयार केला.

२०३० पर्यंतचे आर्थिक कार्यक्रम निश्चित करण्याबरोबरच, आरोग्य, मोबिलिटी आणि नागरिकांमधला आदानप्रदान, अन्नसुरक्षा, नौदल व जलपरिवहन अशा अनेक क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी काही करारही करण्यात आले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी विश्वास व्यक्त केला की, गेल्या वर्षी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि त्यांनी २०३०पर्यंत द्विपक्षीय व्यापार १०० अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे लक्ष्य निश्चित केले होते. परंतु पुतीन यांच्यासोबतच्या पुढील चर्चेनंतर आणि आपल्या भागीदारीतील क्षमता पाहता, हे लक्ष्य आम्ही बऱ्याच आधी पूर्ण करू, याचा मला आत्मविश्वास आहे.

मोदी यांनी सांगितले की, व्यवसायांसाठी सुलभ आणि पूर्वानुमानक्षम व्यवस्था तयार केल्या जात आहेत आणि भारत व युरेशियन आर्थिक संघामधील मुक्त व्यापार कराराबाबत चर्चा सुरू झाली आहे. व्यवसाय असो वा राजनय, कोणत्याही भागीदारीची पायाभूत रचना परस्पर विश्वास असतो, असेही त्यांनी नमूद केले. शिखर बैठकीनंतर मोदी आणि पुतीन यांनी जवळपास दहा दशकांहून अधिक जुनी भारत-रशिया मैत्री नव्याने गती देण्याची इच्छा व्यक्त केली. मोदी म्हणाले की, ही मैत्री भू-राजकीय बदलांनंतरही ‘ध्रुव तारा’समान ठाम आणि अखंड राहिली आहे.

रशियन नागरिकांसाठी भारताचा टुरिस्ट व्हिसा

२०३० पर्यंतचे आर्थिक सहकार्याचे कार्यक्रम मान्य झाले असून, द्विपक्षीय व्यापार व गुंतवणूक अधिक संतुलित असतील, असे मोदी म्हणाले. पंतप्रधानांनी हेदेखील जाहीर केले की, लवकरच रशियन नागरिकांसाठी ३० दिवसांचा मुक्त ई-टुरिस्ट व्हिसा व ३० दिवसांचा ग्रुप टुरिस्ट व्हिसा लागू केला जाईल.

पाश्चिमात्य देशांचे लक्ष

पश्चिमी देशांतील राजधान्यांमध्ये या भेटीने मोठी चर्चा निर्माण झाली आहे. कारण ही भेट अशा वेळी घडली आहे, जेव्हा रशियावर आर्थिक निर्बंध आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत; त्यात रशियन कच्च्या तेल पुरवठ्यावर बंदी समाविष्ट आहे.

भारताला रशियाचे ‘इंधन

पुतीन यांनी म्हटले की, रशिया हा भारताच्या ऊर्जा गरजा भागवण्यासाठी तेल, वायू, कोळसा व इतर वस्तूंच्या अखंड पुरवठ्यासाठी निश्चित असा देश आहे. भारतात लहान व मॉड्युलर न्यूक्लियर रिॲक्टर्स व फ्लोटिंग न्यूक्लियर पॉवर प्लांट्स उभारण्याचे सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत. कृषी, वैद्यकीय क्षेत्रांसह न्यूक्लियर तंत्रज्ञानाच्या अ-ऊर्जा वापरामध्येही मदत देऊ शकते, असे त्यांनी म्हटले. तर मोदी म्हणाले की, दोन्ही देशांमधील कनेक्टिव्हीटी वाढविणे हा एक प्रमुख प्राधान्यक्रम आहे.

  • भारत आणि युरेशियन इकॉनॉमिक युनियनमध्ये एफटीएवर चर्चा सुरू झाली आहे, असे भारताचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

  • भारत-रशिया २०३० पर्यंत १०० अब्ज डॉलरचे द्विपक्षीय व्यापार लक्ष्य साध्य करू शकतात, असे पंतप्रधान म्हणाले.

  • भारत आणि रशिया लस आणि कर्करोग उपचारांच्या विकासात सहकार्य करू शकतात, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

  • इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीमध्ये आपण संयुक्त उपक्रम करू शकतो, असे भारत-रशिया बिझनेस फोरममध्ये पंतप्रधानांनी सांगितले.

  • भारत-रशिया संबंधांची सर्वात मोठी ताकद विश्वास आहे, असे वक्तव्य भारत-रशिया बिझनेस फोरममध्ये मोदी यांनी केले.

  • भारत, रशिया स्थलांतर आणि गतिशीलतेवर करारावर उभय देशांनी स्वाक्षरी केली.

  • भारत, रशियाने आरोग्य, अन्न सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करारांवर स्वाक्षरी केली.

  • बंदर आणि शिपिंग क्षेत्रात सहकार्यासाठी भारत, रशियाने सामंजस्य करार केला.

  • भारत, रशियाने त्यांच्या अर्थव्यवस्थेच्या धोरणात्मक क्षेत्रात सहकार्य विकसित करण्याची योजना जाहीर केली.

  • भारत आणि रशियाने युरेशियन आर्थिक संघासोबत एफटीए लवकर पूर्ण करण्यासाठी काम करत असल्याची घोषणा केली.

  • संपूर्ण जगात सुरक्षित आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळी सुनिश्चित करण्यासाठी भारत, रशिया महत्त्वपूर्ण खनिजांमध्ये सहकार्य महत्त्वाचे आहे.

  • २०३० पर्यंत भारत-रशिया आर्थिक सहकार्य कार्यक्रमावर सहमती दर्शविण्यात आली.

  • भारतासह नवीन आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स मार्ग तयार करण्यासाठी काम करत आहोत, असे रशियन अध्यक्ष पुतीन म्हणाले.

  • लहान मॉड्युलर अणुभट्ट्या आणि तरंगत्या अणुऊर्जा प्रकल्पांच्या बांधकामात सहकार्याबद्दलदेखील चर्चा सुरू असल्याचे सांगण्यात आले.

  • भारत-रशिया शिखर परिषदेनंतर आम्ही ऊर्जा क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा विचार करत आहोत, असे पुतीन म्हणाले.

  • सुरक्षा, अर्थव्यवस्था, व्यापार आणि सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्याला प्राधान्य देण्याचा संकल्प पुतीन यांनी जाहीर केला.

  • द्विपक्षीय देयक निवारणासाठी राष्ट्रीय चलनांचा वापर करण्याकडे वाटचाल करत असल्याचे सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in